Sunday, 24 Jan, 10.26 am CNX Masti

होम
आज नताशा बनणार वरूणची 'दुल्हनिया', समोर आला पहिला फोटो

बॉलिवूड अभिनेता वरूण धवन त्याची बालमैत्रिण नताशा दलालसोबत आज लग्नगाठ बांधणार आहे. अलिबाग येथील द न्यू मेन्शन या अलिशान रिसॉर्टमध्ये हा शाही लग्नसोहळा होणार आहे. लग्नाचे विधी सुरु झाले आहेत आणि सुरक्षेचे कडेकोट बंदोबस्त असतानाही या सेरेमनीचा पहिला समोर आला आहे. या फोटोत वरूण आपल्या मित्रांसोबत पोज देताना दिसतोय. हा फोटो वरूण व नताशाच्या मेहंदी सरेमनीत क्लिक केला गेल्याचे म्हटलेजात आहेत. फोटोत वरूणसोबत मनीष मल्होत्रा व अन्य मित्र आहेत. तूर्तास हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

करोनाचा धोका बघता वरुण आणि नताशाच्या लग्नाला केवळ 50 पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. या 50 पाहुण्यांच्या यादीमध्ये नताशा आणि वरुणच्या कुटुंबीयांना, जवळचा मित्रपरिवार आणि इंडस्ट्रीमधील काही मोजक्याच लोकांचा समावेश आहे. सूत्रांचे मानाल तर आज वरूणच्या लग्नाला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजर राहणार आहेत. सलमान खान, शाहरूख खान, श्रद्धा कपूर, कतरिना कैफ, आलिया भट,रणबीर कपूर, अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस हे स्टार्स वरूण-नताशाच्या लग्नात सहभागी होणार आहेत. मनीष मल्होत्रा व शशांक खेतान आधीच लग्नाला पोहोचले आहेत.

अशी सुरू झाली होती लव्हस्टोरी

नताशा व वरूणच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली ती वरूण व नताशा सहावीत शिकत असताना. होय, सहाव्या वर्गात असताना नताशा व वरूण पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. शाळेत दोघांचीही चांगली गट्टी झाली. मग दोघेही चांगले मित्र बनलेत. 12 व्या वर्गापर्यंत दोघे मित्र होते. दोघेही मानेकजी कूपर स्कूलमध्ये शिकते. वरूण रेड हाऊसमध्ये होता आणि नताशा यॅलो हाऊसमध्ये. दोघेही एकत्र बॉस्केटबॉल खेळायचे. नताशा वरूणला फक्त आणि फक्त मित्र मानत होती. पण वरूण कधीच नताशाच्या प्रेमात पडला होता. एकदा लंचब्रेकदरम्यान वरूणला नताशा दूरून चालत येताना दिसली आणि त्या क्षणालाच तो तिच्या प्रेमात पडला. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, नताशाने वरूणला तीन-चारदा रिजेक्ट केले होते. पण वरूणने हार मानली नाही. तो प्रयत्न करत राहिला आणि अखेर त्याचा प्रेमप्रस्ताव नताशाने स्वीकारला. नताशा एक फॅशन डिझाईनर आहे. न्यूयॉर्कमध्ये ती फॅशन डिझाईन शिकलीय.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: CNX Masti
Top