Dailyhunt
अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'मध्ये मिथिला पालकरची भूमिका, कसा मिळाला सिनेमा? म्हणाली...

अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'मध्ये मिथिला पालकरची भूमिका, कसा मिळाला सिनेमा? म्हणाली...

CNX Masti 2 weeks ago

भिनेत्री मिथिला पालकर आगामी 'भूत बंगला' सिनेमात दिसणार आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित या सिनेमात अक्षय कुमार, परेश रावल, असरानी, राजपाल यादव असे दिग्गज कलाकार आहेत. त्यात मराठमोळी मिथिलाही दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

कालच सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. मिथिलाला हा सिनेमा नक्की कसा मिळाला याबाबत नुकतीच तिने एक पोस्ट केली आहे. तसंच दिग्दर्शक प्रियदर्शन यांचे आभारही मानले आहेत.

मिथिला पालकरने दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यासोबतचा सेटवरील व्हिडीओ शेअर करत लिहिले, "मला ही संधी मिळेल अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती. कल्याणी प्रियदर्शन तुझे खूप आभार. तुझ्याशिवाय हे शक्य झालं नसतं. तू खूप चांगली मैत्रीण आहेस.

प्रियन सर, तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात. तुमच्या सिनेमाचा भाग होणं ही माझ्यासाठी किती मोठी गोष्ट आहे हे मी सांगू शकत नाही. मी नेहमीच कृतज्ञ राहीन. आणि प्रेक्षकहो, तुम्ही ट्रेलरला इतका प्रतिसाद देत आहात हे पाहून भारी वाटतंय."


कल्याणी प्रियदर्शन ही साउथमधली सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'भूलभुलैया','हेरा फेरी','भागम भाग' सारखे सुपरहिट सिनेमे देणारे दिग्दर्शक प्रियदर्शन यांची ती मुलगी आहे. मिथिला पालकरही साउथमध्ये सक्रीय असल्याने कल्याणी तिची चांगली मैत्रीण आहे. मिथिलाला 'भूत बंगला'मध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

सिनेमात अक्षय कुमार, वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू, राजपाल यादव, जीशु सेनगुप्ता आणि मिथिला पालकर दिसणार आहेत. प्रियदर्शन दिग्दर्शित आणि अक्षय कुमार, शोभा कपूर व एकता आर कपूर निर्मित हा सिनेमा १६ एप्रिल रोजी रिलीज होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: CNX Masti