Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
"बाप होणं सोपं नसतं..." स्वप्नील जोशीची भावुक पोस्ट; म्हणाला...

"बाप होणं सोपं नसतं..." स्वप्नील जोशीची भावुक पोस्ट; म्हणाला...

CNX Masti 16 hrs ago

राठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता स्वप्नील जोशी हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. स्वप्नील जोशी हा त्याच्या अभिनयासोबत फॅमिली मॅन म्हणूनही ओळखला जातो. तो कामासोबतच त्याच्या कुटुंबालाही तितकाच वेळ देण्याचा प्रयत्न करतो.

स्वप्नीलची लाडकी लेक मायराचा काल वाढदिवस होता. या निमित्ताने त्याने एक भावुक व्हिडीओ पोस्ट शेअर केला आहे.

स्वप्नीलची मुलगी मायरा हिच्या वाढदिवसानिमित्त त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मायरा तिचा वाढदिवसाचा केक कापत आहे, तर स्वप्नील कामाच्या व्यस्ततेमुळे तिच्याजवळ नसून थेट व्हिडीओ कॉलवरून तिला 'हॅपी बर्थडे' म्हणत तिचे लाड करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत स्वप्नीलने बाप आणि मुलीच्या नात्यातील एक भावनिक बाजू मांडली.

स्वप्नीलने लिहिले, "बाप होणं सोपं नसतं. मुलीच्या वाढदिवशी तिच्या शेजारी बसून, तिच्याबरोबर केक कापायची इच्छा असते; पण त्याच वेळी कामही हाक देत असतं. कारण तिचं आयुष्य थोडं अधिक सुंदर, सुरक्षित आणि सुखाचं बनविण्यासाठी आपण बाहेर धावत असतो". कामामुळे लेकीच्या वाढदिवसाला हजर न राहू शकल्याची खंत व्यक्त करत तो पुढे म्हणाला, "अनेकदा मनात प्रश्न येतात की, मी जे करतोय ते योग्य आहे ना? त्या क्षणी तिच्यासोबत नसताना, खरंच मी तिच्यासाठीच जगतोय ना? ही द्विधा मनःस्थिती कदाचित प्रत्येक बापाच्या आयुष्याचा भाग असते".

"बाबाशिवाय केक कापणार नाही"
स्वप्नीलने लिहिले, "जेव्हा ती हसून म्हणते की, 'बाबाशिवाय मी केक कापणार नाही', तेव्हा त्या एका वाक्यात सगळा थकवा, सगळं रिकामेपण विरघळून जातं. तेव्हा जाणवतं की, मी कितीही दूर असलो तरी तुझ्यासाठी मी नेहमीच तुझा हीरो राहणार. मायरा, तुझा हीरो म्हणून मला निवडल्याबद्दल थँक्यू आणि जगातील नंबर १ बाबा बनवल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. हॅपी बर्थडे मायरा. तुला खूप प्रेम!". स्वप्नीलच्या या भावुक पोस्टवर चाहते आणि मराठी कलाकारांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: CNX Masti