Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
"बॉलिवूडने पाठ फिरवली, फक्त माझे वडील..." परवीन बाबीच्या दु:खद आयुष्यावर पूजा भटची प्रतिक्रिया

"बॉलिवूडने पाठ फिरवली, फक्त माझे वडील..." परवीन बाबीच्या दु:खद आयुष्यावर पूजा भटची प्रतिक्रिया

CNX Masti 2 weeks ago

७०-८० च्या दशकातली सर्वात सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री परवीन बाबी. अमिताभ बच्चन यांच्यासोबत तिचे अनेक सिनेमे गाजले. 'दीवार','अमर अकबर अँथनी','शान','नमक हलाल' अशा अनेक सिनेमांची नावं घेता येतील.

मात्र वैयक्तिक आयुष्यात तिच्या वाट्याला दु:खच आलं आणि एकाएकी तिचा मृत्यू झाला. परवीन बाबीवर मानसिक परिणाम झाला होता असं बोललं गेलं. बरेच महिने आजारी राहिल्यानंतर २००५ साली त्यांचा मृत्यू झाला. आता नुकतंच पूजा भटने परवीन बाबीविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

परवीन बाबीचं आयुष्य आणि शेवट अत्यंत ट्रॅजिक होता. महेश भट यांच्यासोबत त्यांचं अफेअर असल्याची चर्चा होती. आता महेश भट यांची मुलगी पूजा भटने परवीन बाबीविषयी प्रतिक्रिया दिली. विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत पूजा म्हणाली, "बाबा मला परवीन बाबी यांच्या घरी घेऊन गेले होते. मी तेव्हा लहान होते. ती खूप सुंदर होती. माझ्यावर तिचं प्रेम होतं. तिने मला एकदा परफ्युम गिफ्ट केला होता. तो क्षण मी कधीही विसरणार नाही. तीच एक आठवण आज माझ्यासोबत आहे. ती अशी व्यक्ती होती जी समोरच्याला काही ना काही द्यायचीच. हा तिचा स्वभावच होता."

परवीन बाबीच्या कठीण दिवसांबद्दल पूजा म्हणाली, "तिचं आयुष्य खरंच खूप दु:खाने भरलेलं होतं. शेवटच्या काही वर्षात तिच्यासोबत जे झालं त्याला लोक दुर्दैव म्हणू शकतात पण खरं तर ती खूप त्रासलेली होती. ती अजिबातच बरी नव्हती. मी डॉक्टर नाहीए त्यामुळे तिच्या आजाराबद्दल मला सांगता येणार नाही पण ती मानसिक आणि शारिरीक दृष्टीने बरी नव्हती."

एका मुलाखतीत परवीन बाबीने अमिताभ बच्चन आणि बॉलिवूड इंडस्ट्रीवर आरोप केले होते. त्यावरही पूजाने प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, "त्या घटनेनंतर जेव्हा ती परत आली, मला आठवतंय ती स्टारडस्टच्या ऑफिसमध्ये बसली होती. तिथल्या झेरॉक्स मशीनचा वापर करत होती आणि अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मोठी मुलाखत देत होती. अमितजींना तिला मारायचं आहे असं ती सांगायची. तसंच ती फक्त अंडी खायची कारण तिला वाटायचं की बॉलिवूड इंडस्ट्रीने इतर सगळ्यात विष घातलं आहे. याचा अर्थ ती मेंटली डिस्टर्ब झाली होती. ऑफिसमधले लोक तर तिथे बसून मजाच घेत होते. जी वेदनेने कळवळून बोलत होती तिच्याबद्दल आर्टिकल छापले जात होते. ते खरंच खूप वाईट होतं. तिच्या शेवटच्या क्षणी कोणीही तिच्यासाठी उभं राहिलं नाही. तेव्हा फक्त माझे बाबा समोर आले. इतकंच नाही तर तिचं निधन झालं तेव्हा तिचं पार्थिव घेण्यासाठीही रुग्णालयात कोणी आलं नाही. महेश भट यांनी त्यांच्या नात्याचा आदर करत पार्थिव शरीर ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले."

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: CNX Masti