Sunday, 24 Jan, 3.47 pm CNX Masti

होम
'द कपिल शर्मा शो'चे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे!

'द कपिल शर्मा शो'चे असंख्य चाहते आहेत. देशातूनच नाही तर जगभरातील लोक कपिल शर्माचा हा कॉमेडी शो न चुकता पाहतात. दर शनिवारी, रविवारी प्रेक्षकांना खळखळून हसवणा-या या शोचे तुम्हीही चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे कळतेय. अर्थात अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

टेलिचक्करने दिलेल्या वृत्तानुसार, हा शो लवकरच बंद होणार आहे. मात्र काही दिवसांसाठी. त्यामुळे चाहत्यांना निराश होण्याची गरज नाही. होय, काही दिवसांनंतर नव्या सीझनसह नव्या रूपात हा शो पुन्हा वापसी करणार आहे.
लॉकडाऊन काळात 'द कपिल शर्मा शो'चे शूटींग बंद होते. यानंतर 1 आॅगस्ट 2020 पासून शूटींग सुरु झाल्यानंतर शोचे ताजे एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. मात्र अद्यापही कोरोना व्हायरसमुळे शोमध्ये प्रेक्षकांना येण्यास बंदी आहे. अशात आता कपिल शर्मा आपल्या शोला नव्या रूपात आणण्यासाठी सज्ज झाला आहे.

कॉमेडी किंग म्हणून लोकप्रिय असलेल्या कपिल शर्माचे लाखो चाहते आहेत. प्रत्येकाच्या मनात कपिलने घर केले आहे. कॉमेडी नाइट्स विथ कपिल शर्मा आणि द कपिल शर्मा शो सारखे हिट शो दिल्यानंतर अभिनेता कपिल शर्मा घराघरात पोहचला आहे. आता कपिल शर्मा डिजिटल माध्यमात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार कपिल शर्मा लवकरच एका वेबसीरिजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन सुरूवात करणार आहे. मात्र कपिलच्या या प्रोजेक्टबद्दल अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. कपिल शर्मा ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन सुरूवात करण्यासाठी 20 कोटी रुपये मानधन घेत असल्याचे कृष्णा अभिषेकने म्हटले होते. मात्र हे त्याने मस्करीत म्हटले होते की हे खरे आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: CNX Masti
Top