रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेला 'धुरंधर २' सध्या चांगलाच गाजतोय. रणवीर सिंगच्या अभिनयाचं जगभरातून खूप कौतुक होतंय. 'धुरंधर'च्या दोन्ही भागांमध्ये ज्या छोट्या छोट्या कलाकारांनी भूमिका साकारल्या ते सुद्धा प्रेक्षकांच्या लक्षात राहिले.
'धुरंधर'च्या दोन्ही भागांत दिसलेला असाच एक कलाकार म्हणजे मानव गोहिल. 'धुरंधर २' नंतर रणवीर सिंग किती बदललाय? याचा मोठा खुलासा मानवने केला आहे. त्यामुळे सगळेच थक्क झाले आहेत.
रणवीर सिंग कायम एनर्जीने परिपूर्ण असते. पण 'धुरंधर २' नंतर मात्र रणवीर बदलला आहे. मानव म्हणतात, "मला असं वाटतं की, सध्याच्या काळात रणवीर सिंग त्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. तो एका मोठ्या बदलातून जात आहे. तो आता बाबा झाला आहे आणि याचसोबत तो भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या चित्रपटाचा मुख्य नायक देखील आहे. तो आधीपासूनच एक सुपरस्टार आणि अत्यंत सक्षम अभिनेता आहे.''
''त्याला आज जे काही यश मिळाले आहे, त्यासाठी तो पूर्णपणे योग्य आहे. मला खात्री आहे की, भविष्यात त्याच्या आयुष्यात आणखी काहीतरी मोठं घडेल. जर तुम्ही नीट पाहिले असेल, तर त्याच्या कपड्यांच्या स्टाईलपासून ते सार्वजनिक कार्यक्रमात त्याच्या वावरण्यापर्यंत सर्वकाही बदलले आहे. अगदी त्याच्या वागण्या-बोलण्यात आणि स्वभावात खूप फरक पडला आहे. तो आता आधीपेक्षा जास्त समंजस आणि कामाप्रती गंभीर दिसत आहे. त्यामुळे धुरंधरनंतर पूर्णपणे बदललेला माणूस म्हणून रणवीर समोर येत आहे."
अशाप्रकारे मानव यांनी खुलासा केला. मानव यांनी 'धुरंधर २'मध्ये सुशांत बन्सल या अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. हमजाच्या पूर्वायुष्यात अर्थात जसकिरतला मिलिट्री ट्रेनिंग देण्यात सुशांत यांचा मोठा वाटा असतो. मानव यांचे बरेचसे सीन आर.माधवन यांच्यासोबत होते. रॉचे अधिकारी म्हणून दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. मानव हे टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहेत.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: CNX Masti