Dailyhunt
कायदेशीर वाद अन् लेखकानेही सोडला चित्रपट! 'हेरा फेरी ३'ला पुन्हा ब्रेक? 'त्या' चर्चांवर परेश रावल म्हणाले...

कायदेशीर वाद अन् लेखकानेही सोडला चित्रपट! 'हेरा फेरी ३'ला पुन्हा ब्रेक? 'त्या' चर्चांवर परेश रावल म्हणाले...

CNX Masti 6 days ago

Paresh Rawal On Hera Pheri 3: बॉलिवूडमध्ये काही असे चित्रपट आहेत, ज्यांचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. त्यापैकी एक नाव हेरा फेरी. राजू,श्याम आणि बाबू भैय्या हे त्रिकूट असलेल्या या चित्रपटाच्या प्रत्येक भागाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे.

आता लवकरच या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. मात्र,हेरा फेरी ३ ची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट अनेक कारणांमुळे चर्चेत आहे.

मध्यंतरी अभिनेते परेश रावल यांनी चित्रपटातून एक्झिट घेतल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरू लागल्या. त्यानंतर चित्रपटाचे लेखक रोहन शंकर देखील या प्रोजेक्टमधून बाहेर पडले आहेत. इतकंच नाही कायदेशीर वादामुळे देखील हा सिनेमा चर्चेत राहिला आहे. त्यामुळे चित्रपटाचं प्रदर्शनास उशीर होतोय का? अशा अनेक चर्चा सुरु झाल्या. आता या सगळ्या मुद्द्यांवर परेश रावल यांनी भाष्य केलं आहे.अलिकडेच मनी कंट्रोलशी बोलताना परेश रावल म्हणाले, "कोणत्याही अफवांवर विश्वासठेवू नका. हेरा फेरी ३ येत आहे. मी लवकरच त्याचं शूटिंग सुरू करणार आहे." असं म्हणत परेश रावल यांनी चित्रपटाच्या बाबतीत सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

हेरा फेरी सिनेमाचा पहिला भाग २००० साली, तर दुसरा भाग २००६ साली प्रदर्शित झाला होता. दोन्ही भाग प्रचंड यशस्वी ठरले होते. आता चाहते तिसऱ्या भागाबद्दलही उत्सुक आहेत. दरम्यान,'हेरा फेरी ३'ची घोषणा गेल्या वर्षी झाली होती आणि तेव्हापासून तो चर्चेत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: CNX Masti