Friday, 04 May, 12.16 pm CNX Masti

होम
​'क्षितिज... अ होरीझाॅन'च्या शिरपेचात राज्य पुरस्काराचा मानाचा तुरा

अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर यशस्वी कामगिरी करणाऱ्या 'क्षितिज... अ होरीझाॅन' या सिनेमाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा पुरस्कार रोवला गेला आहे. मीडिया फिल्म्स क्राफ्ट कंपनी (यू.एस) आणि नवरोज प्रसला प्राॅडक्शनचे नवरोज प्रसला निर्मित तसेच करिष्मा म्हाडोलकर सहनिर्मित या सिनेमाने नुकत्याच पार पडलेल्या ५५ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या अंतिम यादीत तृतीय क्रमांक पटकावला. तसेच या सिनेमाच्या सर्वोक्तृष्ट ध्वनीमुद्रणासाठी ऑस्करविजेते रसूल पुकुट्टी यांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच याआधी झालेल्या विविध अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये देखील या सिनेमाला नावाजण्यात आले असल्यामुळे दिग्दर्शक मनोज कदम यांच्या 'क्षितिज... अ होरीझाॅन' चे महत्त्व आणखीनच वाढले आहे. शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या या सिनेमाचे प्रोफेसर रेबन देवांगे यांनी लिखाण केले आहे. तसेच नीरज वोरलीया यांनी संकलित या सिनेमाचे योगेश राजगुरू यांनी छायाचित्रण केले आहे.
कान्स सिनेमहोत्सवात राज्य शासनाकडून पाठवण्यात येणाऱ्या तीन सिनेमां सिनेमांमध्ये देखील 'क्षितिज... अ होरीझाॅन' या चित्रपटाची निवड करण्यात आली होती. कान्स सिनेमहोत्सवात राज्य शासनाकडून पाठवण्यात येणाऱ्या सिनेमांमध्ये इडक, क्षितीज आणि पळशीची पी.टी. या तीन चित्रपटांचा समावेश आहे. या सिनेमहोत्सवासाठी एकूण २६ चित्रपटांचे परीक्षण करण्यात आले होते. या २६ चित्रपटांमधून या तीन चित्रपटांची निवड करण्यात आली होती. तसेच विसाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या सिनेमाची निवड झाली होती. तसेच कोलकाता इंटरनेशनल फिल्म फेस्टिवलमध्ये 'क्षितीज' ला नामांकन लाभले होते. मुंबईतील थर्ड आय आशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील हा सिनेमा दाखवण्यात आला होता.
मराठी सिनेमा कात टाकतो आहे. नवीन आशय आणि संकल्पनेच्या जोरावर आतापर्यंत कित्येक मराठी सिनेमांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी घोडदौड केली आहे. या घोडदौडीत भारतातील सामाजिक आणि वास्तववादी विषयावर आधारित असलेल्या मराठी सिनेमांचादेखील समावेश होतो आहे. क्षितिज... अ होरीझाॅन' हा चित्रपट तर विविध पुरस्कार सोहळ्यात आणि फेस्टिव्हलमध्ये गाजत आहे.

​इडक, क्षितीज आणि पळशीची पी.टी. या मराठी चित्रपटांची कान्स आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवासाठी झाली निवड
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: CNX Masti
Top