Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मातृछत्र हरपलं! दाक्षिणात्य अभिनेते अजित कुमार यांच्या आईचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मातृछत्र हरपलं! दाक्षिणात्य अभिनेते अजित कुमार यांच्या आईचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

CNX Masti 2 weeks ago

Actor Ajith Kumar Mother Passes Away: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते अजित कुमार यांच्या आई मोहिनी मणी यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

अभिनेत्याच्या आईच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण इंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून त्यांच्यावर वयोमानाशी संबंधित समस्यांवर उपचार सुरू होते. मात्र,चेन्नईतील एका रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहिनी मणी यांचं चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात निधन झालं. असं बोललं जातंय की, त्यांच्या अंतिम क्षणी सुपरस्टार अजित कुमार त्यांच्यासोबत नव्हते. त्यावेळी अभिनेता परदेशात होता. मात्र, आईच्या निधनाबद्दल कळताच अभिनेता तातडीने घरी परतला. जवळपास दोन वर्षांपूर्वी अजित कुमार यांचे वडील सुब्रमणी यांचं निधन झालं.त्यात आता आईच्या जाण्याने अभिनेत्याच्या कुटुंबियांवर दु खाचा डोंगर कोसळला आहे.

अजित कुमार यांच्या आईच्या निधनाची बातमी समोर येताच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्याच्या आईला श्रद्धांजली अर्पण केल्याचं पाहायला मिळतंय. या कठीण काळात अजित कुमार आणि त्यांच्या कुटुंबाला सावरण्याचे बळ मिळावे, अशी प्रार्थना चाहत्यांकडून केली जात आहे. दरम्यान,अजित कुमार चेन्नईला पोहोचल्यानंतरच मोहिनी मणी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: CNX Masti