Dailyhunt
प्रियंका चोप्रानं पाहिला 'धुरंधर: द रिव्हेंज', रणवीरसाठी फक्त एक शब्द; तर दिग्दर्शक आदित्य धरसाठी म्हणाली...

प्रियंका चोप्रानं पाहिला 'धुरंधर: द रिव्हेंज', रणवीरसाठी फक्त एक शब्द; तर दिग्दर्शक आदित्य धरसाठी म्हणाली...

CNX Masti 2 weeks ago

Priyanka Chopra Reviews Dhurandhar The Revenge : दिग्दर्शक आदित्य धरचा 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) सध्या जगभरात बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवत आहे. या सिनेमानं प्रेक्षकांना वेड लावलं आहे.

'धुरंधर: द रिव्हेंज'चं बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी कौतुक केलं आहे. रजनीकांत पासून ते करण जोहरने 'धुरंधर: द रिव्हेंज' सिनेमासाठी खास पोस्ट लिहिल्या आहेत. आता 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रानेही 'धुरंधर: द रिव्हेंज'चं कौतुक केलं आहे.

प्रियंका चोप्राने नुकतंच 'धुरंधर: द रिव्हेंज' पाहिला आणि ती थक्क झाली आहे. "अभिनंदन माझ्या मित्रा रणवीर सिंग" असं तिनं लिहलं. प्रियंका आणि रणवीरने 'बाजीराव मस्तानी', 'दिल धडकने दो' आणि 'गुंडे' यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे आणि दोघांमधील संबंध खूप चांगले आहेत.

प्रियंकाने चित्रपटातील इतर कलाकार अर्जुन रामपाल, आर माधवन, अक्षय खन्ना, संजय दत्त, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांच्या कामाचेही कौतुक केले. पण, दिग्दर्शक आदित्यच्या कामावर प्रियंका अक्षरशः फिदा झाली. प्रियंकाने लिहिले, "आदित्य, तू एका ध्येयाने काम करणारा माणूस आहेस. 'धुरंधर: द रिव्हेंज' प्रत्येक बाबतीत एक अप्रतिम अनुभव आहे. उत्कृष्ट कलाकारीबद्दल तुमच्या सर्वांचे आभार".

प्रियंका 'वाराणसी'तून करणार कमबॅक

प्रियंका सध्या भारत दौऱ्यावर असून तिने नुकतीच अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला (Golden Temple) भेट दिली. तिथे ती लंगर सेवा करताना दिसली, ज्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. प्रियंका लवकरच भारतीय पडद्यावर कमबॅक करत असून, ती एस.एस. राजामौली यांच्या 'वाराणसी' या भव्य चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: CNX Masti