Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
"रुपाली चाकणकरांची भूमिका करू नका, नाहीतर तुमचं...", दिपाली सय्यदला महिला नेत्याचा धमकीचा फोन

"रुपाली चाकणकरांची भूमिका करू नका, नाहीतर तुमचं...", दिपाली सय्यदला महिला नेत्याचा धमकीचा फोन

CNX Masti 2 weeks ago

संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेल्या नाशिकमधल्या अशोक खरात प्रकरणावर मराठीत सिनेमा येत आहे. 'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स' असं या सिनेमाचं नाव आहे. अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकरांना महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.

अशोक खरात प्रकरणावर येणाऱ्या सिनेमात अभिनेत्री दिपाली सय्यद रुपाली चाकणकरांची भूमिका साकारणार आहेत. मात्र आता त्यांना ही भूमिका न करण्यासाठी राजकीय दबावाला सामोरं जावं लागत आहे. "ही भूमिका करू नका. नाहीतर तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करू", अशी धमकी महिला नेत्याने दिल्याचा धक्कादायक खुलासा दिपाली सय्यद यांनी केला आहे.

एबीपी माझाशी संवाद साधताना दिपाली सय्यद म्हणाल्या, "रुपाली चाकणकरांच्या भूमिकेसाठी मला विचारणा झाली. मी चार महिने बिग बॉसच्या घरात होते. त्यामुळे अशोक खरात हे काय प्रकरण आहे हेच मला माहीत नव्हतं. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर याबाबत कळलं. या प्रकरणात अनेक मोठ्या लोकांची नावंही समोर आली आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात एक धूसर रेष असते ती ओळखता आली पाहिजे. शिवाय जे काही घडलं आहे ते लोकांना समजलं पाहिजे. मला रोलसाठी विचारणा करण्यात आली आहे. मी होकार दिला तर पुढच्या महिन्यापासून शुटिंग सुरु होईल कारण ऑक्टोबरमध्ये सिनेमा रिलिज होणार आहे".


"कलाकारांना कुणीही प्रेशर देऊ नये. पण, मला काही महिला नेत्यांचे फोन आले. तुम्ही रुपाली चाकणकरांची भूमिका करू नका, थोडं थांबून विचार करा. राजकीय करिअर उद्ध्वस्त करू असं म्हणत मला काही महिला नेत्यांनी फोन केले आहेत. रुपाली चाकणकरांची भूमिका मी करते आहे, हे आता समोर आलंच आहे. मी त्या महिला नेत्याचं नाव घेणार नाही, पण असा फोन करणं चुकीचं आहे. माझ्यावर राजकीय दबाव आणला जात आहे. पण मी कुठल्याही दबावाला घाबरत नाही", असं दिपाली सय्यद म्हणाल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबतही यावर चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: CNX Masti