Sunday, 24 Jan, 2.28 pm CNX Masti

होम
शुभमंगल सावधान! सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर अडकले लग्नबंधनात, पाहा फोटो

हस-या चेह-याचा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि सोज्वळ मिताली मयेकर आज लग्नबंधनात अडकले. पुण्यात सिद्धार्थ व मितालीचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्याच्या फोटोंची सर्वांनाच उत्सुकता होती. तर आता या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

'cine gossips' ने सिद्धार्थ -मितालीच्या लग्नसोहळ्याचे काही फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत. पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या लग्नसोहळ्यात मितालीने हिरव्या रंगाची नऊवारी नेसली होती. नाकात नथ, हातात हिरवा चुळा,माथ्यावर बाशिंग असा तिचा लूक होता. तर सिद्धार्थ जांभळ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान केले होते.
सप्तपदीच्या एका फोटोत मितालीच्या चेह-यावर हसू आहे.

या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अभिनेता उमेश कामत, अभिज्ञा भावे, पूजा सावंत, भूषण प्रधान असे अनेक सेलिब्रिटी यावेळी हजर होते.
दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोज केले होते.

लग्न ठरल्यापासून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट सिद्धार्थ व मिताली चाहत्यांसह शेअर करत आहेत. त्यांच्या हळदीचे, मेहंदीचे, संगीत सेरेमनीचे अनेक फोटो याआधीच व्हायरल झाले आहेत. या फोटोंमधील सिद्धार्थ व मितालीची रोमॅन्टिक बघण्यासारखी आहे. तूर्तास या नवविवाहित दांम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. त्यांच्या फोटोंंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे.

साधारण चार वर्षांपूर्वी कोल्हापुरात एका कार्यक्रमात सिद्धार्थ व मितालीची पहिली भेट झाली होती. कार्यक्रम संपवल्यावर अख्खी टीम जेवायला बसली.

मस्करी, मस्ती करताना करता सिद्धार्थ मितालीला असा काही भावला की, मग गप्पा सुरू झाल्या. हळूहळू मैत्री बहरली आणि यानंतर या मैत्रीचे प्रेमात कधी रूपांतर झाले ते दोघांनाही कळले नाही.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: CNX Masti
Top