Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सिनेसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाचा इमारतीच्या छतावरून खाली पडून मृत्यू, नेमकं काय घडलं?

सिनेसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाचा इमारतीच्या छतावरून खाली पडून मृत्यू, नेमकं काय घडलं?

CNX Masti 2 weeks ago

Anik Dutta Passes Away: आजचा दिवस उजाडला तो एका दु:खद बातमीने. बंगाली सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक अनिक दत्ता यांचं निधन झालं आहे. कोलकाता येथील त्यांच्या राहत्या घरी छतावरून पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती.

यानंतर अनिक यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनिक दत्ता हे अत्यंत सर्जनशील दिग्दर्शक होते. त्यांच्या निधनाने इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिक दत्ता हे बुधवारी दुपारी त्यांच्या हिंदुस्तान पार्क इथल्या राहत्या बिल्डिंगच्या छतावर गेले होते. तिथून ते संशयास्पद रित्या खाली पडले. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांचा जीव वाचू शकला नाही. दरम्यान,घटनास्थळावरून पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे, ज्यामध्ये त्यांनी "माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये", असं लिहिलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी नैराश्यातून हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणाची आता पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

अनिक दत्ता हे बंगाली सिनेसृष्टीतील मोठं नाव आहे. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीची सुरुवात जाहिरात क्षेत्रातून केली होती.२०१२ मध्ये आलेल्या भूतेर भबिश्यत या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं. या चित्रपट त्यांच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. त्यांच्या अपराजितो या चित्रपटाला दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आश्चर्य प्रदिप , मेघनाद बध रहस्य वरुणबाबू बंधू, अपराजितो, अशा अनेक सिनेमाचं त्यांनी दिग्दर्शन केलं.'जतो कांदो कोलकातातई'हा २०२५ मधील दुर्गा पूजेच्या काळात रिलीज झालेला त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.अनिक दत्ता यांच्या निधनामुळे बंगाली सिनेसृष्टीत कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: CNX Masti