Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
"स्वत:ला खोलीत कोंडून घेतलेलं, कोणाशी बोलत नव्हतो...", हनी सिंहने सांगितला कठीण काळ, म्हणाला-"देवाच्या कृपेने."

"स्वत:ला खोलीत कोंडून घेतलेलं, कोणाशी बोलत नव्हतो...", हनी सिंहने सांगितला कठीण काळ, म्हणाला-"देवाच्या कृपेने."

CNX Masti 2 weeks ago

Honey Singh: आपल्या म्युझिकने देशभरातच नव्हे, तर जगभरात नाव कमावणारा प्रसिद्ध रॅपर आणि गायक म्हणजे हनी सिंह (Honey Singh).यो यो हनी सिंग याच्या रॅपवर जवळपास सगळ्यांनीच ताल धरला असेल.

अंग्रेजी बीट, लुंगी डान्स यांसारख्या भांगडा हिप-हॉप गाण्यांसाठी लोकप्रिय असलेल्या हनी सिंगचे देशात लाखो चाहते आहेत.'शकल पे मत जा' या चित्रपटात गायलेल्या डेब्यू गाण्यामुळे हनी सिंहलाबॉलिवूडमध्ये आपलं बस्तान मांडलं.मात्र, 'चेन्नई एक्स्प्रेस' आणि 'बॉस' या चित्रपटातील गाण्यांमधून यो यो हनी सिंह याला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. हनीचे 'लुंगी डान्स' हे गाणे अक्षरशः लोकांच्या जिभेवर रुळले. दरम्यान, हनी सिंह बॉलिवूडमधून अचानक गायब झाला.याकाळात तो एका गंभीर आजाराने त्रस्त होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हनी सिंहने त्या काळाबद्दल सांगितलं आहे.

हनी सिंह बायपोलर डिसऑर्डरशी लढत होता. हे सर्व १८ महिने चाललं.मात्र, या सगळ्यातून सावरत त्याने पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात दमदार पुनरागमन केलं. अलिकडेच त्याने एबी टॉक्स सोबत संवाद साधला. त्यादरम्यान हनी सिंहने त्याच्या मानसिक आरोग्याबद्दल भाष्य केलं. त्याने म्हटलं, त्यावेळी मी भारताचा सर्वात मोठा सुपरस्टार होतो. पण नंतर मला बायपोलर डिसऑर्डरचं निदान झालं. गेल्या ७-१० वर्षांपासून मी आरोग्याच्या अनेक समस्यांनी त्रस्त होतो. मी स्वत:ला खोलीत कोंडून घेतलं होतं. कोणाशीही बोलत नव्हतो, कोणालाही भेटत नव्हतो. त्यावेळेस इंटरनेट, टीव्ही, रेडिओ आणि मीडियापासून मी खूर दूर गेलो होतो. मी कोणाशीच बोलायचो नाही. "या मुलाखतीत हनी सिंहने तो वाईट गोष्टींच्या आहारी गेला असल्याचं कबुल देखील केलं.

हनी सिंगने यावेळी खुलासा केला की, तो याआधी नास्तिक होता. मात्र, त्याच्या कुटुंबीयांच्या सल्ल्याने तो अध्यात्माकडे वळला. हनी सिंह त्या घटनेचा उल्लेख करत म्हणाला, "तो दिवस मला अजूनही आठवतो जेव्हा सगळं काही बदललं. एक वेळ अशी आली जेव्हा मी म्हणाले, 'देवा, मला माफ कर. कारण, मी त्याचा अपमान केला होता. मी त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता. त्या रात्री, मी देवाकडे मृत्यू मागितला. कारण माझ्यासोबत जे काही घडत होतं त्यावर माझं नियंत्रण नव्हतं. मी आयुष्यालाच कंटाळलो होतो." असा खुलासा हनी सिंहने केला.

हनीचा विश्वास आहे की त्या रात्रीने त्याचं आयुष्य बदललं. नंतर त्याच्या लक्षात आले की त्याची प्रकृती सुधारू लागली आहे. पुढे तो म्हणाला, "त्यामुळे मला जगण्याचं कारण मिळालं. मला नवीन डॉक्टर मिळाले. हा माझा दुसरा जन्म आहे. मी अजूनही बायपोलर डिसऑर्डरने ग्रस्त आहे, पण देवाच्या कृपेने मी जगभर प्रवास करू शकतो, कार्यक्रम सादर करू शकतो.हा माझ्यासाठी चमत्कार आहे. "असं हनीने यावेळी सांगितलं.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: CNX Masti