बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सलमानचा अत्यंत जवळचा मित्र सुशील कुमार यांचे नुकतेच निधन झाले आहे. सुशील आणि सलमान यांची ४२ वर्षांची मैत्री होती.
सलमानने या प्रसंगी सोशल मीडियावर एक अतिशय भावुक पोस्ट लिहून मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
४२ वर्षांची मैत्री संपली
सलमानने आपल्या मित्राच्या निधनावर शोक व्यक्त करताना लिहिले की, "हा माणूस गेल्या ४२ वर्षांपासून माझ्या भावासारखा होता. तो खूप चांगला, दयाळू आणि मदतीला धावून जाणारा व्यक्ती होता. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तो नेहमी हसत आणि नाचत असायचा. कोणतीही आर्थिक, भावनिक किंवा शारीरिक समस्या असेल तरी तो नेहमी म्हणायचा की, 'काही फरक पडत नाही, सर्व काही ठीक होईल'."
सलमानने पोस्टमध्ये पुढे लिहिले, "तुझ्यासाठी डोळ्यांत पाणी नाही मित्रा, फक्त तुझ्या आठवणी आणि तुझे हसणे मनात राहील. माझा भाऊ हसत-हसत या जगातून गेला, शाब्बास! तू तुझे आयुष्य एका चॅम्पियनसारखे जगला आहेस. आता तू सिगारेट आणि व्हिस्कीचा आनंद घे, मला तुझी खूप आठवण येईल."
मित्राच्या निधनानंतर सलमानने दुसरी एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने जीवनातील सत्य सर्वांसमोर आणले. सलमानने लिहिले की, ''ज्याला जायचे आहे त्याला कधीही थांबवू नका. प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचेच आहे आणि देव चांगल्या माणसांना लवकर बोलावून घेतो. लोक सोशल मीडियावर RIP लिहित आहेत. मी तुला 'पार्थिव' म्हणणार नाही, कारण तुझे व्यक्तिमत्त्व त्या पलीकडचे होते. मी तुला फक्त सुशील कुमार म्हणूनच हाक मारेन.'' सलमान खानच्या या पोस्टवरून त्याच्या मनातील वेदना आणि आपल्या मित्राप्रती असलेले अफाट प्रेम स्पष्टपणे दिसून येत आहे.

