Sunday, 24 Jan, 11.16 am CNX Masti

होम
त्याने मला धमकी दिली म्हणून मी लग्न केले...! राखी सावंत शॉकिंग खुलासा

'बिग बॉस 14' हा शो आता अंतिम टप्प्यात आला आहे. 'बिग बॉस 14'चा काल शनिवारी प्रसारित झालेला एपिसोड एकदम खास होता. या एपिसोडची होस्ट होती काम्या पंजाबी आणि एपिसोडमध्ये सुरुवात झाली ती सवाल-जवाबाने. होय, कालचा एपिसोड मिडिया स्पेशल होता. यादरम्यान बिग बॉसच्या घरात एक प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली गेली. मीडियाच्या पत्रकारांनी घरातील सदस्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. नेहमीप्रमाणे या एपिसोडचे आकर्षण ठरली ती राखी सावंत.
'मीडिया की बेटी' मानल्या जाणा-या राखीने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरेच दिली नाही तर आपल्या उत्तराने सर्वांचे मनोरंजनही केले.

तुझ्या लग्नाची इतकी चर्चा का होते? तू खरंच लग्न केले की हा सगळा ड्रामा आहे? असा प्रश्न राखीला यावेळी विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राखीने कधी नव्हे असा खुलासा केला. होय, तिच्या या खुलाशाने सगळ्यांना धक्का बसला.
मी विवाहित आहे आणि पतीची प्रतीक्षा करत आहे. माझ्या आयुष्यात काही अडचणी होत्या आणि म्हणून मला लग्न करावे लागले असे राखी म्हणाली. पुढे तिने जे काही सांगितले ते ऐकून तर सगळेच हैराण झालेत.

ती म्हणाली, 'काही लोक अर्जंट शॉपिंगला निघतात, काही अर्जंट ब्रेकअप करतात. तसेच मी अर्जंट लग्न केले. भारतातील एका मोठ्या व्यक्तिने मला धमकी दिली होती. मी लग्न केले नाही तर तो मला उचलून नेईल, अशी धमकी त्याने मला दिली होती. मी याबद्दल पोलिसात तक्रार केली नाही. मी धमकी देणाऱ्या त्या व्यक्तिचे नाव सांगितले तर तो आत्ताच मला शो बाहेर काढेन. त्या व्यक्तिच्या धमकीमुळेच मी लग्न केले. यात माझा पती रितेशचा काहीही गुन्हा नाही. माझ्याशी लग्न कर, असे मी त्याला म्हणाले. लग्नाआधी ना त्याने मला पाहिले होते, ना मी त्याला. मी फक्त त्याचे बँक बॅलेन्स पाहिले.'

बिग बॉसच्या घरात अभिनव शुक्लाच्या प्रेमात पडून तू तुझ्या पतीचा विश्वासघात करत नाहीयेस का? असा प्रश्न विचारला असता राखीने मजेदार उत्तर दिले. अजिबात नाही. मी माझ्या पतीला अजिबात धोका देत नाहीये. अभिनवला पाहिले की माझ्या हृदयाची धडधड वाढते,त्याला मी काय करू? असे ती म्हणाली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: CNX Masti
Top