Shamita Shetty: बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते-अभिनेत्री सापडतील, जे करिअरमधील पहिल्याच चित्रपटातून रातोरात स्टार झाले. मात्र, त्यानंतर मोजक्यांचा चित्रपटांमधून काम करत ते मोठ्या पडद्यावर काम करणं सोडून दिलं.
यापैकीच एक नाव म्हणजे शमिता शेट्टी.अभिनेत्री शमिता शेट्टी ही लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण आहे. मोहबत्तें या चित्रपटातून शमिताने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.मात्र, बहीण शिल्पाप्रमाणे तिची कारकिर्द पाहिजे तशी बहरली नाही.शमिता वयाच्या ४७ व्या वर्षीही सिंगल आहे. तिने अद्याप लग्न केलेलं नाही.

अभिनेत्री शमिता शेट्टी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर वाढत्या वयावरून आणि लग्नावरून ट्रोल करणाऱ्या युजरला चांगलंच धारेवर धरलं आहे.संबंधित युजर शमिताला सतत तिच्या पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट्स करत होता.मात्र, यावेळी अभिनेत्रीने त्या यूजरला चांगला धडा शिकवला आहे.
दरम्यान, नुकतीच शमिता शेट्टीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्या व्यक्तीने तिच्या वयावर टीका करत, "तुझं वय झालं आहे, आधीसारखी राहिली नाहीस," असं म्हणत तिचा डिवचलं.शमिताने ट्रोलरला उत्तर देत या स्टोरीमध्ये म्हटलंय, " या उत्तम संधीचा फायदा उचलत तुझ्या या प्रतिक्रियेला मला उत्तम पद्धतीने उत्तर द्यायचं आहे.हो, मी बदलले आहे. वेळेनुसार प्रत्येक गोष्ट बदलते. हेच सत्य आहे. बाह्य सौंदर्य कायम राहत नाही. पण मी माझ्या वयानुसार फिट, हेल्दी आणि आनंदी आहे. देवाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी कृतज्ञ आहे.हीच गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची आहे."
सिंगल लाईफवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना अभिनेत्रीने दाखवला आरसा...
याचबरोबर सिंगल लाईफवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांची अभिनेत्रीने शाळा घेतली आहे. "तू वेळेवर लग्न केलं असतंस, तर तुझी मुलं आज मोठी झाली असती," अशी आक्षेपार्ह कमेंट करण्याऱ्या नेटकऱ्यांनी शमिताने त्याच्या भाषेत उत्तर दिलं आहे. "तुम्ही लग्न करून नेमकं काय मिळवलं?" तिच्या या उत्तराची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. "तुम्ही लोक सिंगल महिलांना वयावरून कमी लेखणं, त्यांना टोमणे मारणं आणि जुनाट विचारसरणी लादणं थांबवा. जर माझं आयुष्य तुम्हाला इतकं खटकत असेल, तर मला फॉलो करणंच बंद करा." असं तिने म्हटलंय. शमिताच्या या वक्तव्याचं अनेकांनी समर्थन केलं आहे.

