Dailyhunt
Video: बॉलिवूडचा 'हा' प्रसिद्ध खलनायक ८४ व्या वर्षी जिममध्ये गाळतोय घाम! व्हिडीओ पाहून चाहते थक्क

Video: बॉलिवूडचा 'हा' प्रसिद्ध खलनायक ८४ व्या वर्षी जिममध्ये गाळतोय घाम! व्हिडीओ पाहून चाहते थक्क

CNX Masti 1 week ago

ज्यांच्या नुसत्या नावाने सर्वांना धडकी भरायची असे बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक म्हणजे रंजीत. आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करणारे रंजीत सध्या सिनेमात काम करत नसले तरीही चाहत्यांच्या चांगलेच संपर्कात आहेत.

नुकताच अभिनेते रंजीत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत ते वयाच्या ८४ व्या वर्षी जिममध्ये घाम गाळून स्वतःच्या फिटनेसवर लक्ष देत आहेत. रंजीत यांचा हा व्हिडीओ पाहून चाहते थक्क झाले आहेत.

वयाची ८४ वर्षे पूर्ण केली असली तरी रंजीत यांचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असा आहे. नुकताच त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर जिममधील वर्कआउटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते व्यायाम करताना थोडे थकलेले दिसत आहेत. पण त्यांची मुलगीच त्यांची फिटनेस कोच आहे. त्यांच्या मुलीने त्यांना दिलेल्या एका सल्ल्याने रंजीत यांना व्यायाम करायला मजा येते.


व्हिडिओमध्ये दिसतं की, व्यायाम करणे कठीण जात असल्याचे पाहून रंजीत आपल्या मुलीला म्हणतात, "नाही यार, हे खूप अवघड आहे." त्यावर त्यांची मुलगी त्यांना मोटिव्हेट करण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवते. ती म्हणते, "बाबा, असं समजा की समोर तुमच्या सिनेमाची हिरोईन आहे आणि तुम्हाला तिला पकडायचं आहे."

हे ऐकताच रंजीत यांच्यातील खलनायक जागा होतो. ते हसतात आणि उत्साहात म्हणतात, "असं सांग ना आधी!" आणि मग ते ते वेगाने व्यायाम करू लागतात. व्यायाम करताना ते गंमतीने ओरडतात, "सोडू का? नाही सोडणार!" शेवटी बाप-लेकीची ही जोडी खळखळून हसू लागते. या व्हिडिओवर नेटकरी भरभरून प्रेम व्यक्त करत असून त्यांच्या या 'क्युटनेस फिटनेस'चे कौतुक करत आहेत.

रंजीत यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'हाउसफुल ५' या चित्रपटात ते 'रंजीत डोबरियाल' नावाच्या अब्जाधीश व्यावसायिकाच्या भूमिकेत दिसले होते. ८४ व्या वर्षीही त्यांचं कामासाठी आणि फिटनेससाठी असलेलं वेड पाहून चाहते थक्क झाले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: CNX Masti