Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विजू मानेंच्या लेकीची भन्नाट कामगिरी, १० वीच्या परीक्षेत किती गुण मिळवले माहित आहे का?

विजू मानेंच्या लेकीची भन्नाट कामगिरी, १० वीच्या परीक्षेत किती गुण मिळवले माहित आहे का?

CNX Masti 3 weeks ago

हावीचे वर्ष तसं शालेय जीवनात फार महत्वाचे असते. कारण हे शाळेचे शेवटचे वर्ष. आज आयसीएसई (दहावी) बोर्डाचा निकाल लागला. ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जाहीर झाला. सर्वत्र निकालाचा जल्लोष पाहायला मिळत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक विजू माने यांची मुलगी गोजिरी हिनेदेखील परीक्षेत यश संपादन केले आहे. विजू माने यांनी सोशल मीडियावर आपल्या मुलीच्या यशाचे कौतुक करणारी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

विजू माने यांनी इन्स्टाग्रामवर एक कार्टून व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एका मुलीच्या हातात निकालाचा कागद दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले, "तिने करून दाखवलं! गोजिरीला खूप जास्त मार्क मिळालेत. तिला परीक्षेत ९५.६ टक्के गुण मिळाले आहेत. तिची मेहनत आणि तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांमुळेच हे शक्य झालं आहे", या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत आनंद साजरा केला.

कलाकारांकडून आणि चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
विजू माने यांच्या या पोस्टवर मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी कमेंट करत गोजिरीचे अभिनंदन केले आहे. अभिनेत्री हेमांगी कवीने "अभिनंदन, कमाल!" अशी कमेंट केली आहे. तर सुकन्या मोने, वैशाली सामंत आणि कुशल बद्रिके यांनीही गोजिरीचे अभिनंदन केले. नेटकऱ्यांनीही यावर मजेशीर आणि कौतुकाच्या कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने गंमतीत म्हटले की, "कुशल काका, अभिजीत काका, संतोष काका आणि गोजिरीच्या बाबांचे मार्क एकत्रित केले तरी गोजिरीचे १५.६% जास्त भरलेत!".

दरम्यान, बालनाट्यापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या विजू मने यांनी गंभीर, विनोदी अशा वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. 'पांडू', 'शर्यत', 'बायोस्कोप' यांसारखे चित्रपट त्यांनी सिनेसृष्टीला दिलेत. विशेष म्हणजे विजू माने हे वयाच्या ४६ व्या वर्षी आयआयटी दिल्लीमध्ये शिक्षण घेत आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांनी एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली होती. त्यांनी देशातील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या आयआयटी दिल्ली (IIT Delhi) मध्ये 'व्हर्च्युअल रिॲलिटी (VR) आणि ऑगमेंटेड रिॲलिटी (AR)' या विषयातील सर्टिफिकेट कोर्ससाठी प्रवेश घेतलाय.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: CNX Masti