विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलिवूडमधलं सर्वात लोकप्रिय कपल आहे. काही महिन्यांपूर्वीच दोघं आईबाबा झाले. कतरिनाने मुलाला जन्म दिला. त्याचं नाव 'विहान' असं ठेवण्यात आलं. ज्युनिअर कौशल कसा दिसतो याची चाहत्यांना उत्सुकता आहेच.
काही दिवसांपूर्वी विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाने विहानची झलक दाखवली होती. तिने त्याचा पाठमोरा फोटो शेअर केला होता. तर आता विकी आणि कतरिनाने विरहानला पापाराझींसमोर आणले. मात्र त्यांनी यावेळी एक अट ठेवली.
सेलिब्रिटी फोटोग्राफर्सने काल इन्स्टाग्रामवर माहिती दिली. विकी आणि कतरिनाने आपल्या लेकाला पापाराझींसमोर इंट्रोड्युस केलं. दोघंही तेव्हा मुंबई विमानतळावर आले होते. विकी कौशलने पापाराझींसमोर पोज दिली. मात्र कतरिनाने विहानला कडेवर घेतलं असल्याने ती कॅमेऱ्यासमोर आली नाही. त्यांनी विहानची पापाराझींशी भेट घडवून आणली पण सोबतच अटही ठेवली. मुलाचे फोटो पब्लिकली पोस्ट करु नका अशी ती अट होती.
कतरिना कैफने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात बाळाला जन्म दिला. विहान सहा महिन्यांचा झाला आहे. चाहते आता विहानला कधी बघायला मिळेल याची वाट पाहत आहेत. २०२१ मध्ये विकी आणि कतरिनाने राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाची बातमी पाहून अनेकांना धक्काच बसला होता. लग्नाआधी दोघांनी रिलेशनशिप सीक्रेट ठेवलं होतं. आता दोघंही पॅरेंटहूड एन्जॉय करत आहेत.
याआधी अनुष्का शर्मा-विराट कोहलीनेही अद्याप त्यांच्या दोन्ही मुलांना कॅमेऱ्यासमोर आणलेलं नाही. तसंच आलिया भट आणि रणबीरनेही काही महिने राहाचा चेहरा दाखवला नव्हता. तसंच सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर आता करीनानेही जेह आणि तैमूरचे फोटो काढण्यासाठी नकार दिला आहे.

