Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आता पाकिस्तानातही कॉकरोच पार्टीची हवा ! सरकारपासून आर्मीपर्यंतचं टेन्शन वाढलं

आता पाकिस्तानातही कॉकरोच पार्टीची हवा ! सरकारपासून आर्मीपर्यंतचं टेन्शन वाढलं

कोकरोच जनता पार्टी हे नाव म्हंटल तरी लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच माहित cjp नक्की काय आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून गल्ली पासून आली पर्यंत फक्त cjp ची चर्चा आहे. नीट पेपरफुटी प्रकरणावर कॉकरोच जनता पार्टीने आवाज उठवून मोठं अनोलन केलं आणि त्याचच परिणाम म्हणजे धर्मेंद्र प्रधान याना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

या सर्वच घामोडींमुळे सीजेपीचे फाऊंडर अभिजीत दीपकेही सध्या सर्वत्र गाजत असून फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांच्या नावाची दखल घेतली गेली.

दरम्यान आता याच अभिजीत दीपकेपासून प्रेरणा घेऊन आता भारताचा शेजारील देश, पाकिस्तानमध्येही एका नव्या ऑनलाइन राजकीय गटाची चर्चा सुरू झाली आहे.'कॉकरोच पार्टी पाकिस्तान' (CPP) या नावाने सुरू झालेल्या या डिजिटल मंचाने सोशल मीडियावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढत असून इंस्टाग्रामवर या गटाचे 1 लाख 12 2हजारांहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. हा गटाने स्वतःला भ्रष्टाचार, घराणेशाही आणि विशेषाधिकारांवर आधारित राजकारणाविरोधात तरुणांचा आवाज म्हणून सादर केलं आहे.

उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, सलमान तरार यांनी या उपक्रमाची सुरुवात केली आहे. ते सध्या न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत आहेत. इंस्टाग्राम वरून मिळालेल्या माहितीनुसार, हे अकाउंट मे महिन्यात तयार करण्यात आले असून ते कॅनडामधून चालवले जात असल्याचं सांगितल जात आहे. एवढंच नव्हे तर, याच महिन्यात या अकाउंटला व्हेरिफिकेशनही मिळाले आहे.

CPP अर्थात कॉकरोच पार्टी पाकिस्तानने देशात पारदर्शक प्रशासन आणि चांगली शासनव्यवस्था निर्माण करण्याचा दावा केला आहे.

पाकिस्तान हा भ्रष्ट माफियांचा नाही, तर सामान्य नागरिकांचा देश आहे, असा या गटाने दावा केला आहे. विशेषतः तरुण आणि सामान्य लोकांच्या समस्या मांडण्यासाठी हे एक आंदोलन असल्याचं त्यांच्यातर्फे सांगण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर वाढता प्रभाव

कॉकरोच पार्टी पाकिस्तान (CPP) सोशल मीडियावर सातत्याने ॲक्टिव्ह दिसत आहे. त्यांच्या पोस्टमध्ये पाकव्याप्त जम्मू-कश्मीर (PoK) मधील परिस्थिती आणि तेथील लोकांच्या प्रश्नांचाही उल्लेख केला जातो. अलीकडेच या गटाने संघटनेतील विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पाकिस्तानमध्ये राजकीय सक्रियतेचे आव्हान

भारतामध्ये जेव्हा CJPचं आंदोलन, त्यांचं प्रदर्शन सुरू होतं, तेव्हा पाकिस्तानमधूनही तरूणांच्या अनेक रिॲक्शन येत होत्या. भारतामध्ये CJP सारख्या व्यंगात्मक किंवा पर्यायी राजकीय मोहिमांना लोकशाही वातावरणामुळे व्यासपीठ मिळतं, अशी प्रतिक्रिया काही पाकिस्तानी तरुणांनी सोशल मीडियावर व्यक्त केली होती. मात्र पाकिस्तानमध्ये अशा प्रकारचा राजकीय विरोध करणे अधिक जोखमीचे ठरू शकते, असंही मत काहींनी मांडलं होतं.

मात्र सोशल मीडियावर वाढती लोकप्रियता असूनही कॉकरोच पार्टी पाकिस्तानला प्रत्यक्षात किती जनाधार मिळेल किंवा हा गट भविष्यात औपचारिक राजकीय शक्ती म्हणून उभा राहू शकेल का, याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेलं नाही.


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bhramar