Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अभिजीत दीपकेंच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली ''ही''  मोठी अपडेट

अभिजीत दीपकेंच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली ''ही'' मोठी अपडेट

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची प्रकृती आज शनिवारी अचानक बिघडली. त्यांच्या प्रकृतीबाब आता डॉक्टरांनी अपडेट दिली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील निवासस्थानी समर्थकांशी संवाद साधत असताना त्यांना अचानक घबराट, मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवला.

त्यांचा बीपीही काही प्रमाणात कमी झाला. त्यामुळे त्यांचे वडील भगवान दिपके यांनी तातडीने डॉक्टरांना घरी बोलावले.

डॉक्टरांच्या माहितीनुसार, सकाळपासून त्यांना मळमळ आणि उलटीसारखे जाणवत होते. त्यांना दोन-तीन उलट्या झाल्या असून, लूज मोशनचाही त्रास झाला. बीपी थोडा लो होता. त्यामुळे त्यांना आयव्ही देण्यात आला असून, पाच-सहा वाजेपर्यंत आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आरामानंतरही प्रकृतीत सुधारणा झाली नाही, तर रक्त तपासणी केली जाणार आहे. दिल्लीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नंतर निगेटिव्ह रिपोर्ट देण्यात आला होता. त्यामुळे डॉक्टर पुन्हा टेस्ट करण्याचा विचार करत आहेत. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता कमी असून त्यांच्यावर घरीच उपचार होत असल्याचे डॉक्टरांनी कळवले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bhramar