Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अभिनेत्री त्रिशा कृष्णन बद्दल डबल मिनिंग विधान, थेट अटक !

अभिनेत्री त्रिशा कृष्णन बद्दल डबल मिनिंग विधान, थेट अटक !

तामिळनाडूत आता एका प्रकरणावरून मोठी खळबळ निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन यांनी अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली. त्यावरुन या सर्व वादाची सुरुवात झाली आहे.

अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि अभिनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी तंजावूरमध्ये कावेरी पाणीप्रश्नावर भाषण करताना केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई करत अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कावेरी पाणीप्रश्नावर बोलताना उदयनिधी यांनी मुख्यमंत्री आणि अभिनेते विजय यांच्यावर निशाणा साधला. "आमचे मुख्यमंत्री कावेरी पाणी प्रश्नावर काहीच बोलत नाहीत. त्याऐवजी, डीएमकेवर (उदयनिधी यांचा राजकीय पक्षावर) खोटे गुन्हे दाखल करण्याचीच त्यांना अधिक चिंता आहे," असं त्यांनी म्हटलं.

याच भाषणादरम्यान उपस्थितांमधील एका व्यक्तीने मोठ्याने अभिनेत्री तृषा यांचं नाव घेतलं. हे ऐकल्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांनी स्मितहास्य करत कथित द्विअर्थी विधान केल्याचा आरोप विजय समर्थकांकडून करण्यात आला. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असून, उदयनिधी यांच्या भूमिकेवरूनही टीका होत आहे. दरम्यान, या प्रकरणात त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bhramar