Dailyhunt
अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आदर्श! २० गुंठे क्षेत्र आणि ४ लाखांचे उत्पन्न; पांडुरंग कुंभार यांची 'स्मार्ट' शेती

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आदर्श! २० गुंठे क्षेत्र आणि ४ लाखांचे उत्पन्न; पांडुरंग कुंभार यांची 'स्मार्ट' शेती

नेक व्यक्तिंनी असे वाटते की शेती हा तोट्याचा व्यासाय आहे. शेतकऱ्यांवर अनेक संकटे येत असतात. आपण आत्ता प्रर्यंत शेतकरी हा आर्थीक दृष्ट्या कायमच खचलेला पहिली आहे. मात्र कराड तालुक्यातील पाली येथील प्रयोगशील शेतकरी पांडुरंग साहेबराव कुंभार यांनी ही समजूत पूर्णपणे खोटी ठरवली आहे.

शेती हा तोट्याचा व्यवसाय आहे" अशी धारणा अनेकदा व्यक्त केली जाते. मात्र कराड तालुक्यातील पाली येथील प्रयोगशील शेतकरी पांडुरंग साहेबराव कुंभार यांनी ही समजूत पूर्णपणे खोटी ठरवली आहे. केवळ २० गुंठे क्षेत्रात दोडक्याची लागवड करून त्यांनी अवघ्या चार महिन्यांत साडेतीन ते चार लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवत शेतीतूनही मोठा नफा मिळू शकतो, हे इतर शेतकऱ्यांना दाखवून दिले आहे.

कमी जागेत मोठा प्रयोग

पांडुरंग कुंभार यांची शेती हीच त्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार आहे. पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता त्यांनी नेहमीच नवीन प्रयोग करण्यावर भर दिला. यंदा त्यांनी २० गुंठे क्षेत्रात दोडका लागवडीचा निर्णय घेतला आणि त्यासाठी शास्त्रशुद्ध नियोजन ही त्यांनी केले. जमिनीची योग्य मशागत करून त्यांनी चार फुटांच्या अंतरावर रोपांची लागवड केली. या नियोजनामुळे प्रत्येक वेलीला वाढण्यासाठी पुरेशी जागा मिळाली आणि उत्पादनक्षमतेत वाढ झाली.

आधुनिक पद्धत

दोडक्याच्या वेली जमिनीवर पडू नयेत आणि फळांची गुणवत्ता चांगली राहावी यासाठी त्यांनी शेतात दोरी आणि काठ्यांचा आधार दिला. या पद्धतीमुळे वेली हवेत वाढतात, फळांचा जमिनीशी संपर्क येत नाही आणि त्यामुळे फळांची लांबी, रंग व गुणवत्ता उत्तम राहते. पांडुरंग कुंभार यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले. कंपोस्ट खतांचा वापर केल्यामुळे पिकाची वाढ वेगाने झाली आणि जमिनीचा कसही टिकून राहिला. यामुळे उत्पादनाची गुणवत्ता आणि बाजारमूल्य दोन्ही वाढले.

कमी खर्चात जास्त नफा

या संपूर्ण प्रयोगासाठी बियाणे, मशागत, मजुरी आणि खतांवर मिळून सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च आला. मात्र चार महिन्यांत त्यांना ३.५ ते ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता सुमारे पावणेतीन लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाल्याने हा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला आहे. विशेष म्हणजे, या यशानंतर त्यांनी पुन्हा एकदा दोडक्याची लागवड सुरू केली आहे.

बाजारपेठेची गरज ओळखणे

दोडका हे आरोग्यासाठी उपयुक्त भाजीपाला असल्याने बाजारात त्याला चांगली मागणी आहे. योग्य नियोजन, सेंद्रिय शेती आणि आधुनिक पद्धतींचा वापर केल्यास अल्पभूधारक शेतकरीही मोठा आर्थिक फायदा मिळवू शकतो, हे कुंभार यांनी सिद्ध केले आहे.


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bhramar