Dailyhunt
अशोक खरात प्रकरणात महसूलमंत्र्यांचा इशारा, खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली नाही, थेट..

अशोक खरात प्रकरणात महसूलमंत्र्यांचा इशारा, खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली नाही, थेट..

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या आणि राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणात रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. अशोक खरातवर आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झाले आहे.

अशोक खरात प्रकरणात अनेक राजकीय नेते तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे देखील समोर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना थेट इशाराच दिला आहे.

अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची केवळ बदली नाही तर खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार, मग ते कोणत्याही खात्यातील असो, असा स्पष्ट शब्दात इशाराच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय.अशोक खरात प्रकरण हे महाराष्ट्राचा संस्कृतीला काळिमा फासणारी घटना आहे. त्यामुळेच, याप्रकरणी एसआयटी योग्य पद्धतीने कारवाई करत आहे. ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी एसआयटीला पुरावे द्यावेत.

नाशिकच्या संस्कृतीला काळिमा फसण्याचा जे काम झालं आहे, त्या संबंधित लोकांवर कडक कारवाई केली जाईल. आमच्या अधिकाऱ्यांनी जर मदत केली असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई होईल. एसआयटी टीमकडून आमच्याकडे नाव आल्यावर त्यांना नोकरीवर ठेवणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

अशोक खरात प्रकरणात कोणीही सुटणार नाही, याप्रकरणी SIT तपास करत आहेत, त्यात ज्या ज्या अधिकाऱ्यांची नावे समोर येतील त्यांना कामावरून काढून टाकणार, असा इशाराच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bhramar