Dailyhunt
भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रॉपर्टीवर छापा; रुद्राक्ष, हिरव्या रंगाचे द्रव्य अन..., SIT ला काय काय सापडले ?

भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रॉपर्टीवर छापा; रुद्राक्ष, हिरव्या रंगाचे द्रव्य अन..., SIT ला काय काय सापडले ?

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच चक्रावून सोडले आहे. सध्या एसआयटीकडून खरातची चौकशी सुरु आहे. या चौकशीतून हादरवणारी माहिती समोर आलीय. अशोक खरातला आज पुन्हा नाशिक सत्र न्यायालयात हजर करणार आहेत.

त्याआधी एसआयटीकडून अशोक खरातच्या कार्यलयात तपास केला. यावेळी एसआयटीने अशोक खरातच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयातून महत्वाचे पुरावे जप्त केले आहेत.

यावेळी तपासादरम्यान पोलिसांना खरातच्या कार्यालयातून अत्यंत संशयास्पद वस्तू मिळाल्या आहेत. ज्याचा वापर जादूटोण्यासारख्या कृत्यांसाठी केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या जप्त साहित्यामध्ये विविध गोष्टींचा समावेश आहे. पोलिसांना त्याच्या ऑफिसमध्ये इंग्रजीतील A ते Z अक्षरे आणि १ ते २६ अंक लिहिलेली एक विशेष पट्टी सापडली आहे. याचा वापर सहसा मृतात्म्यांशी संवाद साधण्यासाठी किंवा 'प्लॅन्चेट' सारख्या अघोरी प्रकारांसाठी केला जातो.

त्यासोबतच एका डब्यातून २२ रुद्राक्ष आणि भिंगाची काच जप्त करण्यात आली आहे. तसेच एका बाटलीत हिरव्या मळकट रंगाचे संशयास्पद पातळ द्रव्य सापडले आहे. हे सध्या रासायनिक विश्लेषणासाठी पाठवले जाण्याची शक्यता आहे. त्यासोबतच शिवनिका संस्थान या नावाचे कोरे पावती पुस्तकही पोलिसांच्या हाती लागले आहे, ज्यातून आर्थिक फसवणुकीचा धागा समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. दुसऱ्या गुन्ह्यात त्याची 7 दिवसाची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी त्याच गुन्ह्यात पोलीस कोठडीची मागणी करण्याऐवजी तिसऱ्या गुन्ह्यात त्याला वर्ग करण्याची विनंती न्यायालयाला केली. त्यामुळे दुसऱ्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येऊन एसआयटीने पुन्हा तिसऱ्या गुन्ह्यत त्याचा ताबा घेतला आहे. सरकारवाडा पोलिसात दाखल करण्यात आलेला तिसरा गुन्हाही महिलचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आहे. 7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर अशोक खरातने अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेची प्रसुती सुरळीत होण्यासाठी आणि विधी केल्यानंतर मुलगाच होईल असे सांगत महिलेवर अत्याचार केला. त्याच्या जवळच्या व्यक्तीच्या पत्नीवरच त्याने अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली होती. याच अत्याचारच्या घटनेनंतर खरात चे बिंग फुटले आणि त्याचे काळे कारनामे जगासमोर आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bhramar