Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बॉलिवूड अभिनेता  सलमान खानच्या जीमला भीषण आग !

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या जीमला भीषण आग !

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला देशातील एक प्रमुख 'फिटनेस आयकॉन' मानला जाता आणि तो कायम त्याच्या चाहत्यांना तंदुरुस्त राहण्याचा सल्ला देत असतो. दरम्यान आता सलमान खानच्या जीमला आग लागली असल्याची अपडेट समोर येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री दक्षिण दिल्लीतील 'ग्रेटर कैलास-1' या उच्चभ्रू भागात घडली. सुदैवाने, पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने मोठी दुर्घटना टळली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पीटीआयच्या वृत्तानुसार, ही घटना गुरुवारी रात्री सव्वा-दहाच्या सुमारास घडली. जिमच्या पहिल्या मजल्यावरून अचानक आगीच्या ज्वाळा वर येताना दिसताच तेथे घबराट पसरली. माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी पावलं उचलली आणि अग्निशमन दलाचं पथक पोहोचण्यापूर्वीच जिममधील सर्व लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. यामध्ये कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. पोलिसांच्या कारवाईनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या; त्यांनी वेळेत आगीवर नियंत्रण मिळवलं. पण घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. Asian Gamesच्या तोंडावर भारतीय कुस्तीला धक्का; स्टार कुस्तीपटू डोप टेस्टमध्ये फेल! NADAकडून सस्पेंड

सुरुवातीच्या तपासात असं समोर आलं आहे की, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असेल. पण पोलीस आणि फायर विभाग आग लागण्यामागचं नेमकं कारण काय? याचा कसून शोध घेत आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, ही जिम सलमान खानच्या स्वतःच्या फिटनेस ब्रँडअंतर्गत चालवली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पोलिसांनी प्रभावित क्षेत्राला सील केलं आहे. एवढंच नाही तर, फोरेंसिक आणि तांत्रिक टीम घटनास्थळाची पाहणी करत आहेत. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे दिसून येत असलं, तरी अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. असं देखील सांगण्यात येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bhramar