Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
खळबळजनक ! अमेरिकेचा इराणवर पुन्हा हल्ला; स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरात ड्रोन स्टेशन उद्ध्वस्त

खळबळजनक ! अमेरिकेचा इराणवर पुन्हा हल्ला; स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरात ड्रोन स्टेशन उद्ध्वस्त

राण अमेरिका संघर्षाने संपूर्ण जगालाच वेठीड धरले आहे. हा संघर्ष थांबता थांबत नाहीये. या तीन महिन्यांच्या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला असून जागतिक स्तरावर इंधनाचे दर गगनाला भिडले.

दरम्यान याच दरम्यान आता एक खळबळजनक अपडेट समोर आली आहे.

मध्य पूर्वेतील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला असून अमेरिकन सैन्याने मध्यरात्री इराणमधील लष्करी तळांना लक्ष्य करत नवीन हवाई हल्ले केले. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरात अमेरिकन नौदल आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांसाठी थेट धोका निर्माण करणाऱ्या इराणच्या तळांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, अमेरिकन लष्कराने इराणचे 4 लढाऊ ड्रोन हवेतच यशस्वीरित्या पाडले आहेत. याशिवाय, इराणच्या रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बंदर अब्बास येथील एका ग्राउंड कंट्रोल स्टेशनवरही अमेरिकेने अचूक हल्ला केला. या नियंत्रण कक्षातून पाचवा ड्रोन उडवण्याची तयारी सुरू असतानाच अमेरिकेने तो तळ उद्ध्वस्त केला. अमेरिकेच्या मते, ही कारवाई अत्यंत मर्यादित आणि केवळ स्वसंरक्षणासाठी करण्यात आली होती, जेणेकरून दोन्ही देशांमधील युद्धविराम कायम राहावा.

दुसरीकडे, इराणच्या निम-शासकीय 'फार्स न्यूज एजन्सी'ने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे स्थानिक समयानुसार साधारण रात्री 1.30 वाजताच्या सुमारास बंदर अब्बास शहराच्या पूर्व भागात तीन शक्तीशाली स्फोटांचे आवाज ऐकू आले. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) शी संबंधित असलेल्या या मीडिया आउटलेटने सांगितले की, या स्फोटांनंतर बंदर अब्बास येथील इराणची हवाई संरक्षण यंत्रणा काही काळासाठी सक्रिय करण्यात आली होती.

दरम्यान, हा हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा दोन्ही देशांमधील तीन महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी शांतता चर्चा सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या सरकारी मीडियाचा तो अहवाल फेटाळून लावला आहे. ज्यामध्ये शांतता कराराचा भाग म्हणून इराण आणि ओमान संयुक्तपणे होर्मुज जलडमरूमध्यातून होणाऱ्या वाहतुकीचे व्यवस्थापन करतील असे म्हटले होते. हा जलमार्ग सर्वांसाठी खुला राहील, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

याआधी सोमवारीही अमेरिकेने इराणच्या नौका आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांवर हल्ले केले होते. इराणने या कारवाईला युद्धविरामाचे उल्लंघन म्हटले आहे, तर अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने हा हल्ला केवळ सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचे सांगितले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bhramar