Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
खरातचा पराक्रम ! भक्तांच्या नावाने १०० बनावट खाती; SITचा मोठा खुलासा

खरातचा पराक्रम ! भक्तांच्या नावाने १०० बनावट खाती; SITचा मोठा खुलासा

भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, भक्तांच्या नावाने तब्बल १०० बनावट बँक खाती उघडल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या खात्यांचा वापर आर्थिक व्यवहारांसाठी करण्यात आल्याची शक्यता असून, विशेष तपास पथकाने (SIT) या प्रकरणात महत्त्वाची कारवाई करत मिलिंद बनकर याला अटक केली आहे.

बनावट खात्यांच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहारांचा आणि त्यामागील संपूर्ण रॅकेटचा तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भोंदू अशोक खरातने भक्तांच्या नावे १०० बनावट खाती उघडून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये आणखी काही आरोपी समोर येणार असल्याचे समजते. ५३ लोकांच्या नावे ही खाती उघडली असून याचे १०० खातेदार आहेत.

एप्रिल महिन्यात राहाता शाखा व्यवस्थापक मिलिंद बनकर व भोंदू अशोक खरात यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आमच्या संस्थेवर कुठलाही दोषारोप नाही. आरोप होताच मॅनेजरला संस्थेने निलंबित केलेले आहे. संस्थेने आतापर्यंत पोलिसांना तपासकामी सहकार्य केले आहे. यापुढेही केले जाईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bhramar