Dailyhunt
Middle East Conflict : पाकिस्तानवर ओढावलं संकट, आजपासून रात्री ८ वाजेनंतर.

Middle East Conflict : पाकिस्तानवर ओढावलं संकट, आजपासून रात्री ८ वाजेनंतर.

ध्यपूर्वेतील युद्धाची झळ जगाला बसत असून अनेक देशांत उर्जा संकट निर्माण झालंय. पाकिस्तानही याला अपवाद ठरलेला नाही. देशव्यापी ऊर्जा संकटावर तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानी सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे.

पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या पेट्रोलियम उत्पादनांसंबंधीच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला.

या निर्देशानुसार, पंजाब, खैबर पख्तुनख्वा, बलुचिस्तान, इस्लामाबाद, गिलगिट-बाल्टिस्तान आणि आझाद जम्मू आणि काश्मीरमधील बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंची दुकानं ही आजपासून रात्री ८ वाजता बंद होतील. मात्र असं असलं तरीही खैबर पख्तुनख्वामधील काही प्रमुख शहरांमधील बाजारपेठांना रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दिलासा देण्यासाठी म्हणून सरकारने गिलगिट आणि मुझफ्फराबादमध्ये एक महिन्यासाठी मोफत आंतरशहरी सार्वजनिक वाहतूक जाहीर केली आहे. मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्यामुळे वाढणाऱ्या जागतिक तेल आणि ऊर्जा किमतींचा सामना करण्यासाठी पाकिस्तान सरकार प्रयत्न करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे उपाय योजण्यात आले आहेत.

जागतिक संकटामुळे पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली. 6 मार्च रोजी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 55 रुपयांनी वाढ केली. त्यानंतर, लगेचच महिन्याभराने 2 एप्रिल रोजी पेट्रोलचा दर वाढला आणि प्रति लिटरसाठी 458.41 रुपये आणि डिझेलसाठी प्रति लीटर 520.35 मोजावे लागत आहेत. मात्र नंतर सरकारने पेट्रोलचा दर प्रति लिटर 378 रुपयांपर्यंत कमी करून तात्पुरता दिलासा दिला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bhramar