Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मोठी बातमी !  बेटिंग प्रकरणी भाजप नगरसेवकाला अटक;  कोल्हापुरात खळबळ

मोठी बातमी ! बेटिंग प्रकरणी भाजप नगरसेवकाला अटक; कोल्हापुरात खळबळ

यपीएल ची क्रेज सगळीकडेच आहे. आयपीएलवर बेत लावण्याचे अनेक प्रकार घडत असून आता असाच एक प्रकार समोर आहे. या प्रकरणात भाजप नेत्याचं नाव समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कोल्हापूरमध्ये एका मोठ्या बेटिंगच्या (पैज) घटनेने खळबळ उडवली होती.

या प्रकरणी आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणात भाजप नेत्याचं नाव समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. भाजप नगरसेवक नितेश पवार यांना तातडीने अटक करण्यात आली आहे.

आयपीएलवरील मोठ्या किंमतीच्या बेटिंगचं इतर राज्यांमध्येही कनेक्शन असल्याचं सांगितलं जात होतं. यानंतर संबंधित प्रकरणाचं राजस्थान कनेक्शन समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आयपीएलच्या मुंबई-राजस्थान सामन्याच्या रणधुमाळीत एका चपलांच्या गोदामात बेटिंगचं रॅकेट सुरू होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नगरसेवकाला राहत्या घराजवळून अटक करण्यात आली आहे. पोलीस या गंभीर बेटिंगचा सखोल तपास करत असून अनेक बड्या नेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bhramar