Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मोठी बातमी; ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला !

मोठी बातमी; ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला !

गेल्या काही दिवसानपासून पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत . पश्चिम बंगाल येथे ममता बॅनर्जी यांची सत्ता जाऊन प्रथमच भाजपाचे सरकार आले आहे. याचदरम्यान आता पश्चिम बंगालमधून एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

पश्चिम बंगालमधील सोनारपूर येथे टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , पश्चिम बंगाल येथे ममता बॅनर्जी यांची सत्ता जाऊन प्रथमच भाजपाचे सरकार आल्यानंतर भाजपा आणि टीएमसी कार्यकर्त्यांमधील संघर्ष संपण्याचे नाव घेत नसताना, आता पश्चिम बंगालमधील सोनारपूर येथे टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त आहे. काही निदर्शकांनी त्यांचा रस्ता अडवत त्यांच्यावर दगड फेक केली. यावेळी सुरक्षा दलांनी तातडीने कारवाई करत त्यांना हॅल्मेट घालून सुरक्षितपणे जमावापासून कसेबसे बाहेर काढल्याचे म्हटले जात आहे.

हा प्रकार सोनारपूर येथील कमराबाद भागात घडल्याचे म्हटले जात आहे. टीएमसीचे खासदार शनिवारी सायंकाळी त्यांच्या पार्टीच्या एका कार्यकर्त्याचे निधन झाल्याने त्याच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी त्यांच्या घरी गेले होते. सायंकाळी साडे चारच्या सुमारास ते कमराबाद येथे पोहचले. त्यावेळी तेथे आधीच भाजपाचे कार्यकर्ते जमले होते. या वेळी निदर्शने करताना महिलांना पुढे ठेवण्यात आले होते. या महिला कार्यकर्त्यांनी खासदार अभिषेक बॅनर्जी येताच त्यांच्यावर अंड्यांचा मारा केल्याचे म्हटले जात आहे.

लोकांची गर्दी आणि निदर्शने पाहून अभिषेक बॅनर्जी यांनी आपली कार रस्त्यातच सोडून बाईकने या भागात शिरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा निदर्शकांनी पीडीत कार्यकर्त्याच्या घराच्या शंभर मीटर आधीच त्यांना रोखले. तेव्हा तेथील लोकांनी टीएमसी खासदाराला पाहताच चोर..चोर अशा घोषणा देण्यास सुरु केल्या. त्यावेळी संतप्त जमावाने रस्त्यावर दोन मोटरसायकली देखील फेकल्या आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर दगड आणि अंडी फेकण्यात आली. पोलिसांनी यावेळी त्यांना हॅल्मेट घालून कसे बसे गर्दीतून वाचवत बाहेर काढले.

गेल्या काही दिवसानपासून पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत . पश्चिम बंगाल येथे ममता बॅनर्जी यांची सत्ता जाऊन प्रथमच भाजपाचे सरकार आले आहे. याचदरम्यान आता पश्चिम बंगालमधून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील सोनारपूर येथे टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bhramar