Dailyhunt
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी डॉ. डी.एस. स्वामी; बाळासाहेब पाटील यांची मुंबईत बदली

नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी डॉ. डी.एस. स्वामी; बाळासाहेब पाटील यांची मुंबईत बदली

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- राज्यातील पोलीस अधीक्षक व उप अधीक्षक दर्जाच्या २१ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला जारी करण्यात आले.


या आदेशामुळे नाशिक परिक्षेत्रातील पोलीस दलाचा चेहरामोहरा बदलला असून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. धोंडोपंत एस अर्थात डॉ. डी.एस. स्वामी यांची नियुक्ती झाली आहे.

तर विद्यमान पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची मुंबई पोलीस दलात उप आयुक्त म्हणून दाखल होतील.

नाशिक परिक्षेत्रातील बदली झालेल्या व नव्याने रूजू होणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणेः (कंसात नियुक्तीचे ठिकाण)

सिंगुरी विशाल आनंद, पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण (पोलीस अधीक्षक, धुळे). सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर (सहायक पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक कार्यालय). श्रवण दत्त, पोलीस अधीक्षक, नंदुरबार (अपर पोलीस महासंचालक आणि सहायक पोलीस महानिरीक्षक आस्थापना यांचे स्टाफ अॉफिसर). मुम्मुका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, चंद्रपुर (पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर). अश्विनी सानप, पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे (पोलीस अधीक्षक, नंदुरबार). तेगबीर सिंह संधु, अपर अधीक्षक, मालेगाव (पोलीस अधीक्षक, जालना). सुरज गुंजाळ, अपर पोलीस अधीक्षक, परभणी (अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव).

डॉ. डी.एस. स्वामी यांनी यापूर्वी नाशिक शहर पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी बजावली असून गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून त्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता. नाशिकनंतर ठाणे शहर येथे पोलीस उपायुक्त तर ठाणे ग्रामीणमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून कामगिरी बजावली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bhramar