Dailyhunt
नाशिक : लैंगिक शोषण प्रकरणी अटकेत असलेल्या रविंद्र एरंडेला 'या' तारखेपर्यंत पोलीस कोठडी

नाशिक : लैंगिक शोषण प्रकरणी अटकेत असलेल्या रविंद्र एरंडेला 'या' तारखेपर्यंत पोलीस कोठडी

नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण ताजे असतानाच सातपूर येथील रवींद्र एरंडे याच्या कारनाम्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ४ एप्रिलला एरंडेला न्यायालयात हजर करण्यात आले होते. आज त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

दरम्यान आता १० एप्रिलपर्यंत एरंडेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत रवींद्र एरंडेकडून 4 मोबाईल फोन जप्त केले असून, त्यातील 'डाटा' रिकव्हर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विशेष म्हणजे, तपासादरम्यान आतापर्यंत 8 पीडित महिलांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून, आरोपीवर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पोलिसांनी एरंडेच्या ताब्यातून 4 मोबाईल, 2 पेनड्राइव्ह आणि 1 मेमरी कार्ड जप्त केले आहे. तसेच त्याच्या ऑफिसवर छापा टाकून काही महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत. या मोबाईलमधील डिलीट केलेला डाटा सायबर तज्ज्ञांच्या मदतीने पुन्हा मिळवण्याचे काम सुरू आहे. आरोपीने गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केले होते.

तपासात आतापर्यंत 8 पीडितांची ओळख पटली असून, यामध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि कंपनीत काम करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. तर हे व्हिडिओ केवळ ब्लॅकमेलिंगसाठी वापरले जात होते की त्यांची 'ब्लू फिल्म' म्हणून विक्री केली जात होती ? यादृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bhramar