Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
फुटबॉल चाहत्यांसाठी खुशखबर !   फिफा विश्वचषक 2026 स्पर्धेला आजपासून सुरुवात

फुटबॉल चाहत्यांसाठी खुशखबर ! फिफा विश्वचषक 2026 स्पर्धेला आजपासून सुरुवात

फुटबॉल चाहत्यांसाठी मोठी आणि एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जगातील सर्वात मोठ्या फिफा विश्वचषक 2026 स्पर्धेलाआजपासून अधिकृत सुरुवात होत आहे. त्यामुळे फुटबॉल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळते आहे.

विश्वचषकाच्या 23 व्या हंगामात यंदा प्रथमच 48 संघ सहभागी होत असून, फुटबॉल इतिहासातील ही सर्वात मोठी स्पर्धा ठरणार आहे.

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांकडे आहे. स्पर्धेतील सामने या तिन्ही देशांतील एकूण 16 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. संपूर्ण स्पर्धेदरम्यान तब्बल 104 सामने होणार असून, जगातील सर्वोत्तम संघ विजेतेपदासाठी मैदानात उतरतील.

स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात मेक्सिकोचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 12.30 वाजता सुरू होईल. या सामन्यापासून पुढील एक महिन्याहून अधिक काळ फुटबॉलचा थरार जगभरातील चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे.

दरम्यान, स्पर्धेचा अंतिम सामना 19 जुलै रोजी अमेरिकेतील MetLife Stadium येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात विश्वविजेतेपदासाठी दोन सर्वोत्तम संघ आमनेसामने येतील.

मात्र, भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी निराशाजनक बाब म्हणजे भारतीय संघाला यंदाही विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवता आलेली नाही. त्यामुळे भारताचा संघ या स्पर्धेत सहभागी होणार नसला, तरी जगातील दिग्गज संघांच्या लढतींकडे भारतीय चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

फिफा विश्वचषक 2026 मुळे पुढील काही आठवडे फुटबॉलच्या रोमांचक आणि ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी जगभरातील क्रीडाप्रेमींना मिळणार आहे.


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bhramar