Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुण्यातील विषारी दारू प्रकरणाचं  भिवंडी कनेक्शन;  ''या'' कंपनीवर मोठी कारवाई!

पुण्यातील विषारी दारू प्रकरणाचं भिवंडी कनेक्शन; ''या'' कंपनीवर मोठी कारवाई!

पुण्यातील विषारी दारू प्रकरणाने संपूर्ण देश हादरला असून आता या प्ररकणात कारवाईचा धडाका सुरू झाला असून आता एक अपडेट समोर आलाय आहे.

या प्रकरणात 15 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने भिवंडी येथे मोठी कारवाई करत संशयित मिथेनॉलचा मोठा साठा जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील रेक्स इंटरनॅशनल कंपनीवर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान तब्बल 1526 किलो संशयित मिथेनॉल जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासात या मिथेनॉलचा वापर अवैध दारू निर्मितीसाठी केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. ज्या ठिकाणी मिथेनॉलचा साठा आढळून आला ते गाळे तात्काळ सील करण्यात आले असून संपूर्ण साठा प्रशासनाने ताब्यात घेतला आहे. तपासादरम्यान पुण्यातील विषारी दारू प्रकरणासाठी लागणारे मिथेनॉल रेक्स इंटरनॅशनल कंपनीकडून पुरवले गेल्याची बाबही समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत भिवंडी पोलीस ठाण्यात कंपनीच्या दोन्ही मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून मिथेनॉल पुरवठ्याचे संपूर्ण नेटवर्क आणि त्यामागील साखळी उघड करण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक चौकशी केली जात आहे.


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bhramar