Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
समोश्यांच्या ट्रेवर ठेवला पाय, ट्रेनमध्ये विक्रेत्याची घाणेरडी कृती कॅमेऱ्यात कैद

समोश्यांच्या ट्रेवर ठेवला पाय, ट्रेनमध्ये विक्रेत्याची घाणेरडी कृती कॅमेऱ्यात कैद

रेल्वे प्रवासादरम्यान विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे प्रवाशांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे.
याआधीही रेल्वेतील अन्नामध्ये अस्वच्छता आढळल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. काहीवेळा जेवणात किडे किंवा पाल सापडल्याच्या तक्रारी झाल्या, तर काही प्रवाशांनी चुकीचे खाद्यपदार्थ दिल्याचाही आरोप केला होता.

दरम्यान, आता समोर आलेल्या नव्या व्हिडीओमध्ये एक विक्रेता समोश्यांच्या ट्रेवर पाय ठेवून बसलेला दिसत आहे. हा प्रकार चालत्या ट्रेनमधील असल्याचे सांगितले जात असून, समोश्यांवर थेट धूळ आणि घाण पडत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते. विशेष म्हणजे हेच समोसे नंतर प्रवाशांना विकले जाणार असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

हा व्हिडीओ indiadailynow या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ट्रेनमधील विक्रेता टॉयलेटजवळ वॉश बेसिनखाली बसला आहे. त्यानं आपले पाय समोस्यांनी भरलेल्या बॉक्सवर ठेवले आहेत आणि तो शांतपणे फोनवर कोणाशी तरी बोलत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ट्रेनमधील फ्लोअरिंगवर किती धूळ असते, हे वेगळं सांगायची गरज नाही. ती धूळ त्या विक्रेत्याच्या पायामार्फत समोस्यांवर पडत आहे आणि तेच समोसे खाऊन पुढे लोक आजारी पडू शकतात. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भयंकर संतापले आहेत आणि या विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

ही घटना नेमकी कुठे घडली, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, विक्रेत्याचा शर्ट फिकट निळ्या रंगाचा दिसत आहे आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकृत विक्रेतेदेखील साधारण अशाच प्रकारचे कपडे घालतात. त्यामुळे हा विक्रेता अधिकृत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हा व्हिडीओ आतापर्यंत १० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओ पाहून जवळपास सर्वच नेटकरी संतापले असून, अशा बेशिस्त विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तर काही जण ट्रेनमध्ये अन्नपदार्थ खरेदी करू नका, असा सल्लाही देत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bhramar