Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंचा अखेर भाजपमध्ये प्रवेश

शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंचा अखेर भाजपमध्ये प्रवेश

राज्यातील घडामोडींना वेग आला असून आता सध्या राजकाणातील पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. दरम्यान आताच्या घडीची एक मोठी अपडेट समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग आला आहे.

मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालय आणि मंत्रालय परिसरात लागलेल्या बॅनर्समुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज दुपारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्राजक्त तनपुरे यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याच कार्यक्रमात त्यांना विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी एबी फॉर्मही दिला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीत तनपुरे यांना भाजपकडून संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घडामोडींना अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नसला तरी प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य पक्षांतरामुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bhramar