Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तुकाराम मुंढेंच्या रडारवर आता राज्यातील अंगणवाड्या ! पोषण आहाराची होणार कडक तपासणी

तुकाराम मुंढेंच्या रडारवर आता राज्यातील अंगणवाड्या ! पोषण आहाराची होणार कडक तपासणी

ध्या राज्यात FDA कडून भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ विकणाऱ्यांवर धडक कारवाई सुरु असून आता अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंची नजर राज्यातील अंगणवाड्यांवर आहे.

निकृष्ट पोषण आहारावर एका अंगणवाडी सेविकेनं सवाल उपस्थित केल्यानंतर आता तुकाराम मुंढेंच्या रडारवर आलेत. FDAनं अंगणवाड्यामध्ये दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराकडे आणि तिथल्या स्वच्छतेकडे आपलं लक्ष वळवलयं. अंगणवाड्यांमध्ये मुलांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी आता तुकाराम मुंढे सज्ज झालेत.

निकृष्ट पोषण आहारावर एका अंगणवाडी सेविकेनं सवाल उपस्थित केल्यानंतर आता अंगणवाड्या अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंच्या रडारवर आलेत. FDAनं अंगणवाड्यामध्ये दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराकडे आणि तिथल्या स्वच्छतेकडे आपलं लक्ष वळवलयं.

निकृष्ट दर्जाचे जेवण, भुंगे लागलेली कडधान्ये, खिचडीत आळ्या आढळणे आणि अन्नातील प्रचंड अस्वच्छता यांसारख्या गंभीर तक्रारींची दखल घेत एफडीने राज्यभर मोठ्या मोहिमेचा इशारा दिलाय.FDA आता दर महिन्याला राज्यातील अंगणवाड्यांमध्ये तपासणी मोहिम राबवणार आहे. जेणेकरून लहान मुलांच्या आरोग्याशी खेळण्याचा कुठलाच प्रकार घडणार नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bhramar