अर्चना पुरण सिंग ही एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे. आज पर्यंत या अभिनेत्रीने आणि उत्तम चित्रपटांमध्ये काम केले छोटी भूमिका साधून हे अनेक चित्रपटांमध्ये तिने नाव कमावले तिने साकारलेल्या भूमिकांना आजही प्रेक्षक विसरलेले नाही.
तर आता हि अभिनेत्री सध्या तिच्या व्लॉग्समुळे चर्चेत आहे. तिचा नवरा, अभिनेता परमीत सेठी, आणि त्यांचे दोन मुलगे, आर्यमन आणि आयुष्मान, हे देखील तिच्या व्लॉग्सचा भाग असतात. ज्या मध्ये ते अनेकदा मस्ती करताना दिसतात. तर आता धाकटा मुलगा आयुष्मानची गर्लफ्रेंड समीक्षा (samiksha)शेट्टी, ही सुद्धा कुटुंबासोबत राहायला आली आहे. याची एक झलक आर्यमनच्या व्लॉगमध्ये दिसली.
या व्लॉगची सुरुवात आर्यमन, योगिता आणि आयुष्मान समीक्षा जाण्याने पाहयला मिळाले व्हिडिओमध्ये, समीक्षा तिची कॉफी मशीन उचलते आणि गंमतीने म्हणते, “हा हुंडा आहे.” हे ऐकून आर्यमन हसतो आणि म्हणतो, “हे पाहून बाबा खूप खूश होतील. मग, सर्व सामान घेऊन ते सेठींच्या घरी पोहोचतात, जिथे आयुष्मान फिल्मी स्टाईलमध्ये समीक्षाला आपल्या जवळ घेउन उचलून घरात घेऊन जातो.
आर्यमान हा व्लॉग सोशल मिडीयावर शेअर केल्यानंतर अनेक व्हिज आले आहेत. तसेच हे चाहत्याना आवडले असुन त्यानी कौतुक आणि अभिनंदन केले आहे. तर आयुष्मानने संपूर्ण घराचे नूतनीकरण करण्यापेक्षा या खोलीच्या नूतनीकरणावर जास्त पैसे खर्च केले आहेत. आणि त्याने हे ही सांगितले की घर त्याला त्याच्या आईवडिलांनी भेट म्हणून दिले आहे.

