Dailyhunt
दमदार 4 कथांनी गाजणार OTT चा हा आठवडा, जाणुन घ्या कोणते आहेत हे सिरीज आणि चित्रपट

दमदार 4 कथांनी गाजणार OTT चा हा आठवडा, जाणुन घ्या कोणते आहेत हे सिरीज आणि चित्रपट

मागील आठवड्यामध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातील एक चित्रपट म्हणजे राजा शिवाजी हा मराठी चित्रपट प्रचंड गाजला. तसेच अनेक सिरीज सुद्धा आल्या. तसेच या आठवड्यात घरी बसून आनंद घेण्यासाठी कोणत्या सिरीज आणि चित्रपट येणार आहेत हे जाणून घेऊयात.

लुखे सिरीज – ‘लुखे’ ही वेब सिरीज या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. ही एक म्युझिकल क्राईम सस्पेन्स सिरीज असून, यात राशी खन्ना, पलक तिवारी आणि किंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘लुखे’ ही वेब सिरीज 8 मे 2026 रोजी प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

डाकैत – ‘डाकैत’ हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता येत आहे. या चित्रपटामध्ये आदिवी शेष आणि मृणाल (mrunal)ठाकूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 8 मे 2026 पासून प्राइम व्हिडिओवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होईल. हा चित्रपट मूळतः 10 एप्रिल 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.

लव्ह इन्शुरन्स कंपनी – हा एक तमिळ रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट 10 एप्रिल 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. आता तो तमिळ, हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. प्राइम व्हिडिओवर त्याचे स्ट्रीमिंग 6 मे 2026 पासून सुरू होईल.

वाझ II: अरबों भाइयों की जीवनी – हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये उत्तम ठरला या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस पांठीबा मिळाला. आणि आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सविन एसए यांनी केले आहे. तर हा चित्रपट 8 मे पासून जिओ हॉटस्टारवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bombabomb