80 ते 90 च्या दशकात अनेक मालिका होऊन गेल्या त्यातीलच एक म्हणजे रामायण आणि महाभारत या सिरीयलला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. त्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आजही त्यातील कलाकार देवतांप्रमाणे प्रेक्षक पूजतात.
या सिरीयल मुळे अनेक प्रेक्षक आपली हातातले काम सोडून मालिका पाहत असत. जरी ही मालिका खूप आधी प्रदर्शित झाली असली तरी आज त्याचे एपिसोड्स फोन द्वारे आपण पाहू शकतो आणि याची क्रीज आजही इतकेच आहे. तर यातील कलाकार आता मोठे झाले आहेत. तर महाभारत मध्ये त्यात एक असे पात्रही होते, राक्षसी योद्ध्याच्या केवळ प्रवेशानेच पडद्यावर एक अनोखा थरार निर्माण व्हायचा. पण यातील हे पात्र साकारलेल्या अभिनेत्याला आजही लोक विसरले नाहित. ही आव्हानात्मक भूमिका जिवंत करण्याचे श्रेय अभिनेता रझाक खान यांना जाते.
अभिनेता रझाक खान (Khan)त्यांनी या पात्रात इतका जिवंतपणा आणला की, प्रेक्षक आजही त्यांचा भारदस्त आवाज आणि प्रभावी शरीरयष्टी विसरू शकत नाहीत. घटोत्कचाच्या भूमिकेतील रझाक खान यांची पडद्यावरील उपस्थिती इतकी प्रभावी होती की त्यांच्यासमोर मोठे योद्धेही फिके वाटत असत. त्यांच्या अभिनयाचे वैशिष्ट्य हे होते की, आपल्या डोळ्यांतून आणि चेहऱ्यावरील हावभावांतून हिडिंबाच्या पुत्राचे शौर्य आणि त्याग अचूकपणे व्यक्त केला.
बी. आर. चोप्रा यांची ‘महाभारत’ ही एक मालिका होती. तर मालिका 1980 च्या उत्तरार्धात आली होती. तर रझाक खान यांचे शारीरिक रूप आणि चेहऱ्याची ठेवण त्यांना इतर अभिनेत्यांपेक्षा वेगळे ठरवत असे. त्यांची तुलना अनेकदा प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय अभिनेते आणि पैलवान मिल्टन रीड यांच्याशी केली जात असे. दोघांमधील साम्य इतके लक्षणीय होते की, लोक त्यांना अनेकदा “भारतीय मिल्टन रीड” म्हणून संबोधत असत.

