Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

Dainik Maval News : महिला व बालविकास विभागाने अंगणवाडीतील घरपोच पोषण आहार योजनेत महत्त्वाचे बदल केले असून, माहे नोव्हेंबर व डिसेंबर २०२६ पासून सुधारित पाककृतींचा पुरवठा केला जाणार आहे.

बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांना अधिक पौष्टिक, रुचकर व दर्जेदार आहार मिळावा, यासाठी शाकाहारी (व्हेज) पुलाव, बहुधान्य पौष्टिक पफ यांचा समावेश करण्यात आला असून खिचडीसोबत स्वतंत्र मसाल्याचे पाकीटही देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे यांनी दिली आहे.

महिला व बालविकास विभागाच्या सुधारित सूचनेनुसार पौष्टिक मूगडाळ खिचडी प्रीमिक्स हा पदार्थ कायम ठेवण्यात आला असून, त्यासोबत स्वतंत्र मसाल्याचे पाकीट दिले जाणार आहे. पौष्टिक तूरडाळ खिचडी प्रीमिक्स ऐवजी आता व्हेज पुलाव उपलब्ध करण्यात येणार आहे. पौष्टिक बहुधान्य-प्रथिन मिश्रण पाककृती पूर्ववत राहणार असून, भरडधान्ययुक्त बहुधान्य-प्रथिन मिश्रण ऐवजी बहुधान्य पौष्टिक पफचा समावेश करण्यात आला आहे. या सुधारित आहाराचा लाभ अंगणवाडीतील बालके, गरोदर महिला व स्तनदा माता यांना मिळणार आहे.

महिला व बालविकास विभागाने घरपोच पोषण आहार योजनेतील पाककृतींमध्ये बदल करण्यामागे लाभार्थ्यांना अधिक पौष्टिक, रुचकर आणि स्वीकारार्ह आहार उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. बालके, गरोदर महिला आणि स्तनदा माता आहार आवडीने खावेत, यासाठी व्हेज पुलाव आणि बहुधान्य पौष्टिक पफ यांचा समावेश करण्यात आला आहे.

श्रीमती अंकिता पाटील, सभापती, महिला व बालविकास समिती:
जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण भागात ४ हजार ३९५ अंगणवाड्या कार्यरत आहेत. या केंद्रांमार्फत जवळपास १ लाख ६ हजार बालके, तसेच गरोदर महिला आणि स्तनदा माता यांना घरपोच पोषण आहाराचा लाभ दिला जातो. माहे नोव्हेंबर व डिसेंबर-२०२६ महिन्यापासून सुधारित घरपोच पोषण आहाराचा पुरवठा केला जाणार आहे. लाभार्थ्यांना अधिक पौष्टिक व चविष्ट आहार मिळावा, या उद्देशाने व्हेज पुलाव, मल्टीग्रेन न्युट्री पफ आणि स्वतंत्र मसाला पाकिटाचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये या सुधारित ‘खाद्यसूची’नुसार पुरवठा सुनिश्चित करण्यात येईल.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी - जाणून घ्या
मावळमध्ये असणार 'एनडीआरएफ'चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता
लोणावळा येथील जगप्रसिद्ध "लोणावळा चिक्की"ला 'जीआय टॅग' ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख
रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Maval