Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Lonavala Rain : लोणावळा शहरात हंगामातील सर्वाधिक पाऊस ! रस्ते पाण्याखाली, अतिक्रमणांमुळे अनेक भाग जलमय

Lonavala Rain : लोणावळा शहरात हंगामातील सर्वाधिक पाऊस ! रस्ते पाण्याखाली, अतिक्रमणांमुळे अनेक भाग जलमय

Dainik Maval News : लोणावळा शहरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. शुक्रवारपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली असून दिवसेंदिवस पावासाचा जोर वाढताना दिसत आहे. पर्यटननगरी आणि हिलस्टेशन असलेल्या लोणावळा शहर आणि परिसरात मावळ तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो.

रविवारी (दि.५) सकाळी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत चालू हंगामातील सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली.

मागील २४ तासांत लोणावळा शहर परिसरात तब्बल २६७ मिली मीटर इतक्या अर्थात १०.५१ इंच सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच चालू हंगामातील हा सर्वोच्च पाऊस असून एकूण १०९० मिली मीटर पाऊस आतापर्यंत लोणावळा शहरात झाला आहे. लोणावळ्यात गेल्यावर्षी एकूण हंगामात ६३०७ मिली मीटर पाऊस झालेला होता. यंदा जरी पाऊस उशीरा आला असला तरी यंदाही जोरदार पाऊस बरसेल, असा अंदाज आहे.

अनेक रस्ते पाण्याखाली –
पावसाचा जोर जास्त असल्याने आणि पाण्याचा योग्य निचरा होऊ न शकल्याने शहरातील नागरी भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. तसेच, वाहतुकीचा वेग मंदावला आणि वाहन चालकांनाही वाहन चालविता कसरत करावी लागली. तर दुसरीकडे ओढे, नाले यांवरील अतिक्रमणांमुळे वस्तीत अनेक ठिकाणी पाणी शिरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
पवन मावळ परिसरात दमदार पाऊस ! पवना धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ; ओढे-ओहोळ प्रवाहित झाल्याने पाण्याची आवक सुरू
शेतकऱ्यांना दिलासा! स्वतःच्या शेतातील माती-मुरूम वापरल्यास रॉयल्टी नाही; पोलीस वा महसूल कारवाईही होणार नाही
पुणे-लोणावळा तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी तत्काळ दुरुस्त करा; खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे बोर्डाच्या निदेशकांकडे मागणी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Maval