Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मावळ तालुक्यातील 2337 शेतकऱ्यांची एकूण 11 कोटी 21 लाख रूपयांची कर्जमाफी

मावळ तालुक्यातील 2337 शेतकऱ्यांची एकूण 11 कोटी 21 लाख रूपयांची कर्जमाफी

Dainik Maval News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत मावळ तालुक्यातील २३३७ शेतकऱ्यांसाठी ११ कोटी २१ लाख रूपयांची कर्जमाफी पहिल्या टप्प्यात घोषित करण्यात आली आहे.

मावळ तालुका सहाय्यक निबंधक नवनाथ भोसले यांनी ही माहिती दिली.

राज्य शासनाने कर्जमुक्त्ती योजनेच्या पहिला टप्पातील पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली असून, यामध्ये मावळ तालुक्यातील २३३७ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

संबंधित पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सेवा संस्था,कर्ज घेतलेल्या बँका व सहकारी कार्यालय, सहाय्यक कार्यालय निबंधक या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. संबंधित यादीमध्ये नाव असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भोसले यांनी केले आहे.

उर्वरित पात्र शेतकऱ्यांची यादीही लवकरच जाहीर होईल असेही सहाय्यक निबंधक भोसले यांनी यावेळी सांगितले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप
'गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी' … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Maval