Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार ! बुधवारी धरणे आंदोलन

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार ! बुधवारी धरणे आंदोलन

दैनिक मावळ (प्रतिनिधी) – पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा तसेच पवना धरणग्रस्त प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे प्रलंबित पुनर्वसन, पर्यायी जमीन आणि मोबदल्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, या मागण्यांसाठी पवना बंदिस्त जलवाहिनी कृती समिती, मावळ तालुक्यातील सर्वपक्षीय संघटना आणि शेतकरी यांच्या वतीने बुधवारी (दि.

१ जुलै) सकाळी ११ वाजता मावळ पंचायत समितीसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

याबाबतचे निवेदन मावळचे तहसीलदार यांना देण्यात आले. तसेच या निवेदनाच्या प्रती मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री संजय भेगडे तसेच वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

राज्य शासनाकडून पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येताच शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये पुन्हा एकदा तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन, पर्यायी जमीन आणि मोबदल्याचे प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याने हे आंदोलन करण्यात येत असल्याचे कृती समितीने स्पष्ट केले आहे.

निवेदन देताना पवना बंदिस्त जलवाहिनी कृती समितीचे अध्यक्ष तथा माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, विश्वनाथ शेलार, शिवसेना नेते भारत ठाकूर, माजी सभापती एकनाथराव टिळे, जमीन हक्क समितीचे अध्यक्ष सुभाषराव धामणकर, यशवंत बोडके, जमीन हक्क परिषदेचे अध्यक्ष माऊली सोनवणे, भाजप कामगार आघाडीचे अध्यक्ष सूर्यकांत सोरटे, नारायण बोडके आदी उपस्थित होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव
Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला
Lonavala Rain : पर्यटननगरी लोणावळा शहरात मुसळधार सरी, २४ तासांत ९४ मि.मी. पावसाची नोंद
मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Maval