Bangladeshi woman trafficking | जळगावमध्ये बांगलादेशी तरुणीला नोकरीचं आमिष दाखवून देहविक्रीसाठी आणल्याचा धक्कादायक प्रकार. पोलिसांची गोपनीय कारवाई, शहरात खळबळ.
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहर पुन्हा एकदा देहविक्रीच्या धंद्यामुळे चर्चेत आलं आहे.
एका बांगलादेशी तरुणीला नोकरीचं आमिष दाखवून भारतात आणलं गेलं आणि तिचा वापर देहव्यापारासाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी ही तरुणी ताब्यात घेऊन पर्दाफाश केला असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
नोकरीचं स्वप्न दाखवून नरकात ढकललं!
सदर पीडित तरुणीला सुरुवातीला 'भारतात चांगली नोकरी मिळवून देतो' असं सांगून सीमापार आणण्यात आलं. जळगावमध्ये आल्यानंतर मात्र तिच्या हातात नोकरी नव्हे, तर देहविक्रीचं आयुष्य देण्यात आलं. खासगी फ्लॅटमध्ये ग्राहकांकडे पाठवून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता.
महत्वाच्या बातम्या
पोलिसांची गोपनीय कारवाई
जळगावातील प्रोफेसर कॉलनीत एका बांग्लादेशी महिलेला डांबून ठेवत तिच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती पुणे येथील फ्रिडम फर्म या संस्थेला मिळाल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
त्यानुसार त्यांनी तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेवून माहिती दिली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार उपनिरीक्षक शरद बागल, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, रविंद्र कापडणे व महिला पोलीस अंमलदार अश्विनी सावकारे यांच्यासह जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील पोहेका भारती देशमुख हे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह प्रोफेसर कॉलनीत थडकले. पोलिसांनी घराची झडती घेतली असता, एका खोलीत बांग्लादेशी तरुणी मिळून आली.
बांग्लादेशी तरुणीकडे तिच्या आयडी कार्डची झेरॉक्स मिळून आली. चौकशी दरम्यान तिने दि. २३ रोजी नाशिक रेल्वे स्टेशनवर पुजा जाधव हिची भेट झाली. तसेच पैसे घेवून देहविक्री करण्यास सांगितले. तिला नकार दिला असता, तिने शिवीगाळ केल्याचे सांगितले.
पीडित तरुणीला जळगावात आणून डांबून ठेवत तिच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करुन घेणाऱ्या पुजा आत्माराम जाधव या महिलेविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम व विदेशी व्यक्ती अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशातील तरुणींचा वापर?
ही घटना एकट्याच बांगलादेशी तरुणीची नसून, अशा अनेक पीडित मुली देशभरातून अशाच प्रकारे भारतात आणल्या जात असल्याचा संशय आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू असून काहींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
शहर हादरलं! नागरिकांमध्ये संताप
या प्रकरणामुळे जळगावकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बांगलादेशातून आणलेल्या मुलींचा देहविक्रीसाठी वापर करणाऱ्या टोळ्यांमुळे शहरातील सामाजिक वातावरण कलुषित होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

