Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

ळगाव - तालुक्यातील धानोरा गावाजवळ रात्रीच्या वेळी कथित वाळू चोरी व वाहतुकीच्या प्रकारावरून मोठा तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. संतप्त गावकऱ्यांच्या जमावाने वाळू वाहतूक करणाऱ्या काही वाहनांची तोडफोड केल्याचे वृत्त आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक सुरू असल्याचा आरोप करण्यात येत होता. याच पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित वाहनांना अडवून त्यांची तोडफोड केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या गोंधळात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वाहनालाही लक्ष्य करण्यात आल्याची चर्चा असून यांच्या वाहनावरही हल्ला झाल्याचे प्राथमिक वृत्त समोर येत आहे. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.

या प्रकरणी नेमकी घटना काय घडली, किती वाहनांचे नुकसान झाले आणि पुढील कारवाई काय होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अपडेट प्रतीक्षेत
या घटनेबाबत प्रशासन आणि पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात येईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik NAJARKAID