Dailyhunt
'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानाची मुदत वाढवली ; महिलांना मिळताय 'हे' मोठे लाभ

'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानाची मुदत वाढवली ; महिलांना मिळताय 'हे' मोठे लाभ

मुंबई, दि. 29 : 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियान दिवाळी पर्यंत राबविण्या बाबत शासनाने मुदत वाढ दिली असून या बाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला सुचना दिल्या आहेत.

'या' अभियानातून मिळताय अनेक लाभ.

'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ रूग्णास देण्याकरिता यंत्रणा कार्यान्वित करणे, मदत सेल उभा करावा. याच मोहिमेच्या माध्यमातून रूग्णाचे आरोग्य विषयी आयुष्यमान भारत कार्ड तयार करून देणे. कोरोना सारखी आपत्ती पुढे आल्यास या हेल्थ डाटाचा उपयोग आपत्ती निवारणासाठी करता येईल शिवाय नवीन मोहीम देखील राबविण्याकरिता याचा उपयोग होणार आहे. दरम्यान मोहिमेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अभियानामुळे महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण झाली आहे, हे या अभियानाचे यश आहे

आरोग्य मंत्र्यांनी दिल्या या सूचना

मंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले की, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी आधिकारी यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपापल्या यंत्रणेला कार्यान्वित करण्याच्या सूचना द्याव्यात. जनजागृती, समुपदेशन तसेच प्रत्यक्ष भेटी यावर पुढील काळात भर देऊन मोहीम यशस्वी करावी. मोहीम फक्त तपासणी वरच न थांबता पुढे गंभीर आजारा संबंधी उपचार आणि त्याकरिता लागणारा खर्च या बाबत रूग्णास सर्वतोपरीने मदत करावी.अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आरोग्य विभागांच्या योजनांबाबत यावेळी माहिती दिली. डॉ. साधना तायडे यांनी आभार मानले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik NAJARKAID