Friday, 27 Nov, 5.16 am प्रभात

ताज्या बातम्या
65 वर्षांपूर्वी प्रभात : अमेरिकेत बांधलेली रेल्वे इंजिने भारताकडे रवाना

सर्वोदयाला नवा साज लो-क-रा-ज्य

भीवावरम ता. 26 - लोकशाहीपेक्षा विशाल आणि भारताला उपयुक्‍त अशा 'लोकराज्या'च्या आपल्या नवकल्पनेचे आचार्य विनोबाजी भावे यांनी आज पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण केले

- 1) लोकशाही म्हणजे बहुमताची हुकुमत जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त भले करणे हे लोकशाहीचे ध्येय आहे. परंतु लोकराज्याची कल्पना लोकशाहीहून भिन्न आहे. सर्वांचे जास्तीत जास्त भले करणे हे लोकराज्याचे उद्दिष्ट आहे. 2) हिंसेचा त्याग केला तरच लोकराज्याचे स्वप्न साकार होईल. 3) लोकराज्यात सत्तेचे केंद्र दिल्लीला नसेल तरे ते खेड्यात असेल. 4) लोकराज्यात प्रत्येक खेड्याला आणि मरतुकड्या माणसापासून धटींगपणापर्यंत सर्वांनाच समान हक्‍क असतील.

वजन उचलण्याचा विक्रम

कलकत्ता - वजन उचलणारा अमेरिकन पहेलवान चार्लस व्हिन्सी याने रशियाचा जागतिक उच्चांक मोडला. रशियाचा व्लाडिमीर स्टोवने 286.5 पौंडाचा विक्रम केला होता. व्हिन्सीने 290 पौंड वजन उचलून तो विक्रम मोडला.

पोर्तुगीज व्हाइसरॉयचे पुतळ्यास डांबर माखले

सावंतवाडी - गोव्याचे माजी व्हाइसरॉय अफोन्सी डी. अल्बुकर्क यांचे पुतळ्यास काल डांबर फासण्यात आल्याचे कळते. पोर्तुगीज सत्तेचा वाढदिवस काल गोवेकरांनी काळा म्हणून पाळला. वसाहतशाही मुर्दाबादची पत्रके एका पुतळ्याचे चौथऱ्यास चिकटविली होती. या प्रकरणी काही कोळ्यांना अटक करण्यात आली आहे.

अमेरिकेत बांधलेली रेल्वे इंजिने भारताकडे रवाना

फिलाडेल्फिया - भारतासाठी 100 प्रचंड आकाराची वाफेची इंजिने व त्यांना जोडावयाचे कोळशाचे डबे तयार होत आहेत. त्यापैकी चार इंजिने व कोळशाचे डबे बुधवारी येथून भारताकडे रवाना झाले.
या प्रसंगी भारतीय वकिलातीचे व अमेरिकन उद्योगपतींचे प्रतिनिधी आणि अमेरिकन आरमारी अधिकारी हजर होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top